esakal
जळगाव

Jalgaon Crime : आत्या म्हणत घरात घुसला, अन् तिजोरीतून लाखोचा डल्ला

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime : भोरस बुद्रुक येथे रक्षाबंधनाच्या दिवशी आत्या म्हणत घरी घुसलेल्या व्यक्तीने घरात असलेल्या पेटीमधील एक लाख ७ हजार रुपये व आठ ग्रॅम सोन घेऊन पसार झाला आहे. (thief stole lakh rupees jalgaon crime news)

रक्षाबंधनाच्या दिवशी दुपारी दोनच्या सुमारास भोरस गावातील वयोवृद्ध महिला घरी एकटीच असल्याने त्याचा फायदा घेत दुचाकीने आलेला एक अनोळखी माणूस म्हणाला, की आत्या मी भुताने (ता. चांदवड, जि. नाशिक) गावातून तुमच्या लहान मुलाच्या सासरवाडीतून आलो आहे. तसेच तुमच्या मोठ्या मुलाने पासपोर्ट फोटो व आधार कार्ड घ्यायला पाठवले आहे.

असे बोलून त्याने वयोवृद्ध महिलेकडे पाणी प्यायला मागितले. त्याचवेळी काहीतरी तोडण्याचा आवाज आल्याने वयोवृद्ध महिला त्या खोलीकडे आली. पेटीचा कोंडा त्या चोरट्याने तोडला. हे बघून बिथरलेली महिला रडू लागली व जोरजोरात आवाज द्यायला लागली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

चोरट्याने हाताला मिळतील एवढी रक्कम व काही मौल्यवान वस्तू सोबत घेत खोलीच्या बाहेर पळ काढला. लोखंडी पेटीच्या कोंडा तोडून पेटीत ठेवलेल्या पिशवी मधील तीन लाखांपैकी एक लाख व एका पाकिटात ७ हजार रुपये रोख दुसरा पॅकेटात ८ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या ८ गोळ्या आदी वस्तू चोरट्याने चोरून पसार झाला आहे.

या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात कळताच पोलिस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेतली आणि संपूर्ण घटनेची माहिती घेऊन तपास सुरू केला. गावात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज फिर्यादीने दिलेल्या माहितीच्या आधाराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ग्रामीण पोलिस प्रशासन करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP नेत्यांचा मोठा विजय! आंदोलनाला वेग; अखेर अभिजीत दिपके यांच्यासह तिघांची सुटका, आता सर्वोच्च न्यायालयात काय घडणार?

Navratri 2026 Wishes in Marathi: 'उदे ग अंबे उदे'... नवरात्रीनिमित्त व्हॉट्सॲपवर शेअर करा देवी दुर्गेच्या आशीर्वादाचे हे सुंदर शुभेच्छा संदेश

Maharashtra Live News :सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मतदानाला सुरुवात...

IND vs WI 3rd T20: इंदूरमध्येही आज बॅट विरुद्ध बॅट? दुसऱ्या सामन्यात ५०१ धावांचा पाऊस, आता तिसऱ्या टी-२०मध्येही फलंदाजांचे वर्चस्व राहणार?

Madhya Pradesh: अकराशे विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप; टीबी रुग्णांना ८ किलोची पोषण आहाराची टोपली

SCROLL FOR NEXT