crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : अमळनेरला चोरट्‍यांनी 3 दुकाने फोडली

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : येथील बस स्टॅन्ड समोरील भागवत रोडवर आठ दिवसात तीन दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली. यामुळे लहान व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ऐन दिवाळीत चोऱ्या होत असल्याने दुकानदार भयभीत झाले आहेत. (Thieves broke 3 shops in Amalner jalgaon crime news)

सुरवातीला चोरट्यांनी या रस्त्यावरील पवार मोबाईल हे दुकान फोडून दुकानातील आठ ते दहा मोबाईल हँडसेट व सुमारे दहा हजारांची रोकड लंपास केली. त्यानंतर याच रांगेतील शिरोडे प्रोव्हिजन फोडून तेथून काही रोकड व किराणा साहित्य चोरले.

या चोरीच्या घटना ताज्या असतानाच गुरुवारी (ता. १६) रात्रीच्या सुमारास राजकमल फूट वेअरच्या वरच्या पत्र्याचे स्क्रू काढून दुकानातील चार ते पाच हजारांचे चप्पल व बूट लंपास केले.

याबाबत दुकान मालक जयेश राजेंद्र राठोड यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या‍याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, याच रस्त्यावरील इतरही काही दुकानांवर अशाच प्रकारच्या चोऱ्या झाल्या आहेत.

बाजारपेठेतील अनेक मुख्य चौकांमध्ये लोकसहभागातून ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसविण्यात आले आहेत. तरीही चोरीच्या घटना अजूनही पूर्णपणे थांबलेल्या नाहीत. स्थानिक पोलिसांचा चोरट्यांवर वचक राहिला नसल्याने चोऱ्यांमध्ये कमालीची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

Wimbledon 2026: यानिक सिनरचा डबल धमाका! सलग दुसऱ्यांदा उंचावली ट्रॉफी, ३ तास ४६ मिनिटांचा थरारक सामना...

Medha Manjrekar Cancer: मेधा मांजरेकरांच्या कॅन्सरवर लेक सईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली- आई तू खूप...

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मोठा धक्का ! ९२ लाख महिलांची नावे वगळली; 'ही' मोठी कारणे आली समोर

SCROLL FOR NEXT