Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime : 4 लाखांचे सोने घेऊन चोरटे पसार; सराफा रिफायनरी फोडली

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : जोशीपेठेतील सोने रिफायनरी दुकानात चोरट्यांनी मंगळवारी (ता. १३) पहाटे पाचला डल्ला मारला. दुचाकीने आलेल्या दोन्ही चोरट्यांनी कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. (Thieves looted Sarafa Refinery with gold worth 4 lakhs jalgaon crime news)

सुमारे चार लाख रुपयांचे सोने, चांदी घेऊन चोरटे पसार झाले. स्टेट बँक दरोडा, जळकेतील सराफा दुकान फोडल्यानंतर आता चोरट्यांनी थेट सराफ बजारावरच लक्ष केंद्रीत केले असून, जोशी पेठेतील सराफा रिफायनरीच फोडून ऐवज लंपास केला.

जोशी पेठेत जितेंद्र राजाराम जगताप यांच्या मालकीचे सराफा रिफायनरी कारखाना वजा दुकान आहे. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास रथ गल्लीतून एका दुचाकीने चोरटे जोशीपेठेत पोचले. त्यांनी सोने, चांदीचे टंच काढून देणाऱ्या राज रिफायनरीचे कुलूप कटरच्या साहाय्याने तोडून आत प्रवेश केला.

काही वेळ दुकानात शोधाशोध करीत एका चोरट्याने काऊंटर तोडले. त्यातून सुमारे चार लाख रुपयांचे सोने काढून नेले. दुकानमालक जगताप सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात माहिती दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

माकड टोपी-जॅकेट घालून चोरी

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज संकलित केले असून, त्यात दुचाकीवरून दोन चोरटे आलेले दिसत आहेत. नंबर प्लेटवर चार अंकांपैकी पुढील अंक दिसत नसून उर्वरित तीन अंक ७०० असे आहेत. चोरट्यांपैकी एकाने काळ्या रंगाचे जॅकट व पांढरी पँट घातली आहे, तर दुसऱ्याने निळ्या रंगाचे जॅकेट परिधान केले आहे. तोंड झाकले जावे, यासाठी माकड टोपी घातली असून, राखाडी रंगाचे मफलर तोंडाला गुंडाळले आहे. याच चोरट्याने काऊंटर फोडून ऐवज लुटला आहे.

कुलूप कटरने तोडले

दुकानाचे कुलूप तोडण्यासाठी कटरचा वापर केला आहे. पिवळ्या रंगाचे कटर सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. दोन्ही चोरटे २५ ते ३० वयोगटातील असल्याचे समोर आले आहे. शनिपेठ पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे पोलिस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Petrol Pump: पुण्यात सातनंतर पेट्रोलपंप सुरु राहणार का? संध्याकाळी काय निघाला तोडगा?

Pachod Crime : पाच लाखासाठी मुकादमाकडून ऊसतोड कामगाराचे अपहरण; पाचोड येथे गुन्हा

Pregnant Woman and Traffic Police Viral Video : भररस्त्यात प्रेग्नंट महिला ओरडत होती, पण तरीही वाहतूक पोलिस स्कूटी चालवतच राहिला, नक्की काय घडलं?

Viral Video Tractor : नाद केला पण वाया नाही गेला, ट्रॅक्टरवाल्या भावाने स्पिकरवर फॉरेनर नाचवल्या; 'चुनरी चुनरी' चा इन्स्टावर व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi Breaking News Live Update: म्हाडाचे भाडेतत्त्वावरील घरे धोरण मसुदा तयार

SCROLL FOR NEXT