Theft esakal
जळगाव

सावधान! गुलाबी थंडीत चोरट्यांचा तडाखा; 2 दिवसांत 3 घरे फोडली

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : ममुराबाद रोडवरील शिवाजीनगर उस्मानिया पार्क येथे चोरट्यांनी सलग तीन घरे फोडून सोन्याचे दागिने (Gold jewelry), रोकड (Cash), लॅपटॉप (Laptop) आणि टॅबसह (Tab) मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली.
ममुराबाद रोडवरील उस्मानियॉ पार्क येथे रविवारी (ता. ९) मध्यरात्री सलग तीन घरे चोरट्यांनी फोडल्याचे सोमवारी (ता. १०) सकाळी ७ वाजता उघडकीस आले आहे.

यात, फिरोज मोहम्मद रफिक बागवान (रा. उस्मानिया पार्क) यांच्या घराच्या मागच्या दाराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत घरातील लोखंड कपाट तोडून घरातील ४ तोळ्याच्या दोन सोन्याचे पोत, १० हजार रुपये रोख आणि पैशांचा गल्ला चोरून नेला. त्यांच्या घराच्या बाजूला मोहम्मद जुबेर शेख रफिक यांचे कादरिया ट्रेडर्स या दुकानात कोल्ड्रीग्जचे होलसेल दुकान आहे. या ठिकाणीदेखील चोरट्यांनी घराचा मागचा दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. एक लॅपटॉप, मोबाईल टॅबलेट आणि ८० हजार रुपयांची रोकड चोरली आहे. त्यानंतर याच घराच्या बाजूला राहणारे नावेद अहमद शेख नाशिर (वय ३४) हे कुटुंबीयांसह नाशिक येथे लग्नाला गेले होते. नावेद शेख यांच्या घराच्या मागचे लोखंडी दरवाजा चोरट्यांनी तोडून घरातील लोखंडी कपाट तोडले. कपाटातील ८ ग्रॅम सोन्याची पोत, २ सोन्याच्या अंगठ्या, अर्धाकिलो चांदीचे दागिने आणि २० हजार रुपयांची रोकड लांबविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट! कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी समिती स्थापन

Latest Marathi News Live Update : १९ शेतकऱ्यांनी किडन्या विकल्या गृह विभागाची माहिती

Pune News : आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रभाग स्तरावर नियोजन करा; महापौर मंजूषा नागपुरे यांचे आदेश

Pune Crime : खंडणीसाठी युवकाचा स्वतःच्या अपहरणाचा बनाव; घरातूनच मागितली दोन लाख रुपयांची खंडणी

PAK vs ENG, T20 WC: “बॉल कुठे, बॅट फिरवतोस कुठे?” बाबर आजमची विकेट चर्चेत; पाकिस्तानचा पायावर कुऱ्हाड मारणारा निर्णय अन् इंग्लंडची सरशी

SCROLL FOR NEXT