Child death
Child death esakal
जळगाव

Jalgaon News: लोंबकळलेल्या वीजतारेला स्पर्श; चिमुरडीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील निमखेडी शिवारात घराच्या अंगणात सोमवारी (ता. २०) सकाळी खेळताना पाचवर्षीय चिमुकलीचा लोंबकळलेल्या वीजतारेला स्पर्श होऊन जागेवरच मृत्यू झाला. धनवी महेंद्र बाविस्कर (रा. निमखेडी, दत्तमंदिराजवळ) असे मृत चिमुरडीचे नाव आहे.

धनवी महेंद्र बाविस्कर घराशेजारी राहणाऱ्या लहान मुलांसोबत गल्लीत खेळत होती. त्या वेळी खेळता खेळता लोंबकळलेल्या वीजतारेला धनवीचा स्पर्श झाल्याने तिला विजेचा जोरदार धक्का बसला. यात ती गंभीर जखमी झाली.

तिला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन महाजन यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. तिच्या आई-वडिलांनी प्रचंड आक्रोश केला. वडील महेंद्र छगन बाविस्कर हातमजुरी करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात, तर घरी आई, आजी आणि एक बहीण आहे.

हेही वाचा: झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाइकांनी गर्दी केली होती. या घटनेबाबत जळगाव तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

इतर बचावले

खेळता खेळता धनवीचा वीजतारेला स्पर्श होताच ती चिकटून पडली. गल्लीतील तरुणांसह रहिवाशांनी तिला उचलून जिल्‍हा रुग्णालय गाठले. धनवीसोबत खेळत असलेले इतर मुले सुदैवाने बचावले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: ठाणे लोकसभा उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे घेणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT