traffic police  esakal
जळगाव

वाहतूक पोलिसांना कंबरदुखी, गुडघेदुखी, फ्रोज शोल्डरचा त्रास

जळगाव शहरात वाहतूक नियंत्रित करण्याची जबाबदारी असलेल्या शहर वाहतूक शाखेतील कर्मचारी सतत उभे राहून ड्युटी करतात.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जळगाव शहरात वाहतूक नियंत्रित करण्याची जबाबदारी असलेल्या शहर वाहतूक शाखेतील कर्मचारी सतत उभे राहून ड्युटी करतात. सतत उभे राहिल्याने कंबरदुखी, गुडघेदुखी, मान दुखणे, सायटिका, चक्कर येणे, फ्रोजन शोल्डर, हातापायाला मुंग्या येणे, कामावरून घरी गेल्यावर डोके, पाय सुन्न होणे आदी व्याधींनी ग्रासले आहे.

ग्राहक पंचायतीच्या जळगाव तालुका शाखेतर्फे वाहतूक व सायबर पोलिसांसाठी वाहतूक शाखेच्या कार्यालयात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यात ४६ जणांची तपासणी करून त्यांच्या आजाराचे निदान व ॲक्युप्रेशरद्वारे उपचार करण्यात आले. या शिबिरात वाहतूक शाखेच्या ६९ मनुष्यबळापैकी ३६ व सायबर शाखेच्या १० अशा एकूण ४६ कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. वाहतूक शाखेचे निरीक्षक लीलाधर कानडे, उपनिरीक्षक कैलासिंग पाटील, ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. अविनाश सोनगीरकर, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र गांगुर्डे, सचिव गिरिधर डाभी, सहसचिव डॉ. नितीन धांडे उपस्थित होते. वाहतूक शाखेच्या ६९ कर्मचाऱ्यांपैकी अवघ्या ३६ जणांची तपासणी झाली. हे सर्वच विविध शारीरिक व्याधींनी त्रस्त असल्याचे तपासणीत दिसून आले.

दोन महिने उपचाराचा सल्ला

शिबिरात व्याधी निदान झाल्यानंतर व्यायाम तसेच मशिनद्वारे २० मिनिटे ॲक्युप्रेशर उपचार करण्यात आले. त्यामुळे त्यांना तात्पुरता आराम मिळाला असला तरी काही जणांना किमान दीड ते दोन महिने सातत्याने उपचार घेण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Earless Boy Hears: जन्मजात कान नसूनही येणार ऐकू; केईएमच्या डॉक्टरांनी १३ वर्षीय मुलाला दिले नवजीवन

Video Viral: अहो बाई काय हा प्रकार? हॉटेलमध्ये सहा जणांनी सातव्यासोबत रंगेहाथ पकडलं, त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं

भाजीत मीठ कमी का? पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत छतावरून खाली दिलं फेकून; 5 महिन्यांच्या गर्भवतीचा दुर्दैवी अंत

धक्कादायक! भाजपचे आमदारांने महिलांचे केले शोषण; तृप्ती देसाईंचा गंभीर आराेप, मुख्यमंत्र्यांकडे केली राजीनाम्याची मागणी

Pralhad Joshi: इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण, दर वाढविण्यासाठी प्रयत्न : प्रल्हाद जोशी

SCROLL FOR NEXT