file photo
file photo esakal
जळगाव

Jalgaon News : वाहतुकीचे रस्ते अतिक्रमणाने भरले; पदाधिकारी, नगरसेवकांचाही आशीर्वाद?

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील रस्त्यांवर अगोदरच खड्डे पडले असून, त्यात आता वाढत्या अतिक्रमणाची भर पडली आहे. त्यामुळे वाहनधारकांनी वाहने चालवायची तरी कसे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. (Traffic roads filled with encroachments Blessings of office bearers corporators too Jalgaon News)

विशेष सर्वच भागांतील रस्ते अतिक्रमणाने गच्च भरले आहेत. महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकही आता कर्मचाऱ्यांअभावी निष्क्रिय ठरले असून, आता हे अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिका प्रशासन काय उपाय करणार, याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.

अतिक्रमण निर्मूलन विभागात कंत्राटी भरतीला मनाई करणारे पदाधिकारी व नगरसेवकही या वाढत्या अतिक्रमणाला जबाबदार असून, त्यांचाही आशीर्वाद असल्याचा आरोप होत आहे.

शहरात भररस्त्यावर दररोज अतिक्रमण वाढत आहे. प्रत्येक रस्त्यावर आणि चौकातही अतिक्रमण झाले आहे. ‘अतिक्रमणरहित रस्ते व चौक दाखवा आणि बक्षीस मिळवा’, अशी जाहिरात दिल्यास कोणालाच बक्षीस मिळणार नाही, अशी जळगावची शहराची स्थिती आहे.

असे रस्ते, असे अतिक्रमण

नेहरू चौक ते टॉवर चौक या रस्त्यावर दोन्ही बाजूला विक्रेत्यांचे अतिक्रमण आहे. जशी जशी सायंकाळ होईल तसतसे या रस्त्यावर विक्रेत्यांचे अतिक्रमण वाढत जाते. विशेष म्हणजे, याच रस्त्यावर चारचाकी व दुचाकी पार्किंग केली जातात.

त्यामुळे हा रस्ता रहदारीसाठी शिल्लक राहात नाही. टॉवर चौक ते घाणेकर चौक हा रस्ता तर अतिक्रमणाने गच्च भरला आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला विक्रेते बसलेले असतात. विशेष म्हणचे, या ठिकाणी पोलिस ठाणेही आहे. मात्र, त्याच्याही आजूबाजूला अतिक्रमण असते. जुन्या महापालिका इमारतीची जागा तर अतिक्रमणाने व्यापली आहे.

महापालिका आपल्या या जागेवरचे अतिक्रमणही काढू शकत नाही. पुढे घाणेकर चौकाची परिस्थिती तर अत्यंत वाईट आहे. या ठिकाणीही विक्रेत्यांच्या गाड्या लागल्या आहेत. पुढे थेट भिलपुरा मशिदीपर्यंत दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असते. या भागात वाहन चालविणे म्हणजे सर्कस करणेच आहे.

चित्रा चौक ते गणेश कॉलनी रस्त्यावर तर इतके अतिक्रमण झाले आहे, की या ठिकाणी फळवाले जणूकाही आपल्या हक्काची जागा असल्याप्रमाणे आपली चारचाकी गाडीवर दुकाने लावून बसलेले असतात. जुन्या इंडो अमेरिकन दवाखान्यासमोर या विक्रेत्यांमुळे दररोज वाहतूक कोंडी होत असते.

याच रस्त्यावर पुढे फुलवाल्याचे, तर पुढे थेट जुन्या ख्वॉजामिया झोपडपट्टीपासून तर गणेश कॉलनीपर्यंत फळविक्रेते, भाजीविक्रेत्यांचे अतिक्रमण आहे. याशिवाय शहरातील नेहरू चौक, बेंडाळे महाविद्यालयाजवळील चौक तर अतिक्रमणाने व्यापला आहे. पुढे आकाशवाणी चौक ते थेट महाबळ कॉलनीपर्यंत मोठमोठे अतिक्रमण आहे.

अगदी अधिकाऱ्यांच्या बंगल्याबाहेर भाजी व फळविक्रेत्यांचे अतिक्रमण आहे. एमआयडीसी रस्त्याची अवस्थाही तशीच आहे. एस वर्कशॉप चौकातही अतिक्रमण आहे. पुढे याच रस्त्यावर भंगारवाल्यांनी जणूकाही आपली हक्काची जागा असल्यामुळे थेट रस्त्यापर्यंत दुकाने मांडली आहेत. या सर्व अतिक्रमणामुळे शहरात वाहतुकीसाठी रस्ता आहे कुठे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

अतिक्रमण विभाग निष्क्रिय

महापालिकेत अतिक्रमण निर्मूलन पथक आहे. मात्र, आता ते केवळ नावालाच असल्याचे सांगण्यात येत आहे. या विभागाकडे आता कर्मचारी नसल्याची तक्रार आहे. केवळ सात कर्मचारी असल्यामुळे कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे सांगण्यात येत आहे. या विभागात कत्रांटी कर्मचारी भरतीस परवानगी मिळाली होती.

मात्र, महासभेत ती रद्द करण्यात आली. नगरसेवकाकडून ही भरती रद्द करण्याचा नेमका हेतू काय, याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे. मात्र, नगरसेवकांच्या या भूमिकेमुळे शहरात रस्त्यावर अतिक्रमण वाढत असून, नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने या विभागात कंत्राटी कर्मचारी भरती करून अतिक्रमण निर्मूलन पथक सक्रिय करण्याची गरज आहे.

अपघात झाल्यास मनपा जबाबदार

शहरात वाढत्या अतिक्रमणामुळे अपघात होण्याचाही धोका आहे. शहरात अपघात झाल्यास त्याला वाढते अतिक्रमण आणि त्यावर कारवाई करणारे महापालिका प्रशासन जबाबदार असणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या वाढत्या अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवावी व रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करावेत, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: बिश्नोईने दूर केला तुफानी खेळ करणाऱ्या सुनील नारायणचा अडथळा, कोलकाताने गमावली दुसरी विकेट

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT