Crime news esakal
जळगाव

3 आशयर वाहनातून 45 म्हशी, रेड्यांची वाहतूक; पोलिसात गुन्हा दाखल

ही जनावरे कत्तलखान्यात घेऊन जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : तीन आयशर वाहनातून तब्बल ४५ म्हशी व रेड्यांची अत्यंत निर्दयीपणे वाहतूक केल्याप्रकरणी तिन्ही आयशरचालकांच्या विरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी, आज सकाळी साडेदहाच्या सुमारास पिलखोड (ता. चाळीसगाव) येथून मालेगावकडे जाणाऱ्या तीन आयशर ट्रकमधून गुरांच्या ओरडण्याचे आवाज काही ग्रामस्थांनी ऐकले. या वाहनांमधून गायींची वाहतूक होत असल्याच्या संशयावरुन गावातील तरुणांनी तिन्ही आशयर गाड्या पुलाच्या बाजूला असलेल्या पेट्रोल पंपाजवळ थांबवल्या व मेहुणबारे पोलिसांना याबाबत कळवले. त्यानुसार, सहाय्यक पोलिस निरीक्षक तुषार देवरे हे आपले सहकारी उपनिरीक्षक श्री. चव्हाणके, हवलदार योगेश मांडोळे, मोहन सोनवणे, अन्वर तडवी, ज्ञानेश्वर बडगुजर यांच्यासह पिलखोडला गेले असता, संबंधित ठिकाणी ताडपत्रीने बंद असलेल्या तीन आयशर ट्रकमध्ये अत्यंत निर्दयीपणे म्हशी व रेड्यांना कोंबलेले आढळून आले. तिन्ही वाहनांची कसून तपासणी केली असता, एम. एच. १८ बीजी ४८०० या वाहनात १६ जनावरे, एम. एच. १८ व्हीएच ३८०० या क्रमांकाच्या आयशरमध्ये १५ तर एम. एच. १८ बीजी ६२४५ यात १४ जनावरे अशी एकूण ४५ जनावरे मिळून आली. यात बहुसंख्य म्हशी असून काही रेडे आहेत. या गुरांच्या खरेदी-विक्रीचा अथवा वाहतुकीचा कुठलाही परवाना त्यांच्याकडे नव्हता. त्यामुळे ही जनावरे कत्तलखान्यात घेऊन जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

तिघांविरोधात गुन्हा दाखल

याबाबत हवालदार योगेश बोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशियत मोहसीन खान सिराज खान (वय ३४, रा. बालसमंद ता. जि. खरगोन, तहसील कसरावत (म. प्र.), वसीम खान हनीफ खान (वय २७, रा. कॉलनी मेजमपूर, बालसमंद ता. जि. खरगोन, तहसील कसरावत (म.प्र.) व सद्दाम खान रशीदखान (वय ३३, रा. खडकवानी, ता. जि. खरगोन, तहसील कसरावत (म. प्र.) या तिघा आयशर चालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हशी, रेडे व आशयर ट्रकसह एकूण ३४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhayandar: मुंबईत मराठी माणसाला घर देण्यास नकार, महिलेचा आरोप; प्रताप सरनाईकांचा संताप

Crime: कर्जत-खोपोली मार्गावर अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला; हत्या की घातपात?

Latest Marathi Update Live: नीट पेपरफुटी प्रकरणी मनिषा मांढरेची न्यायालयीन कोठडीत रवानगी, तर हवालदारला सीबीआय कोठडी

खेकडेच राहणार तुम्ही... रितेश देशमुखच्या त्या व्हिडीओवरून नेटकऱ्यांमध्येच जुंपली; चाहत्यांनी ट्रोलर्सना सुनावलं; नेमकं प्रकरण काय?

Kolhapur Rice Theft : गोदामातून तांदळाची 72 पोती चोरणाऱ्या तीन महिलांना अटक; मध्यरात्री टेम्पो बोलावून नेली पोती

SCROLL FOR NEXT