Triple Maharashtra Kesari Vijay Chaudhary statement about loksabha election jalgaon news 
जळगाव

Jalgaon News: संधी मिळाल्यास लोकसभा लढवू; ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांचा मनोदय

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : ‘मला राजकारणाची आवड असून, समाजकार्य करण्यासाठी मला लोकसभा किंवा विधानसभाही चालणार आहे. माझा आवडता पक्ष भाजप असून, मला अशी काही ऑफर आली, तर नक्कीच विचार करू.

त्यामुळे निवडणूक लढवण्याची संधी दिली, तर नक्कीच लढवू’, अशी इच्छा तालुक्याचे भूमिपुत्र, ट्रिपल महाराष्ट्र केसरी तथा लाचलुचपत विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक विजय चौधरी यांनी व्यक्त केली. (Triple Maharashtra Kesari Vijay Chaudhary statement about loksabha election jalgaon news)

खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना चौधरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, विजय चौधरी यांच्या या मुलाखतीची व्हिडिओ क्लीप गुरुवारी (ता. ३०) दिवसभर तालुक्यात चर्चेचा विषय ठरली होती. त्यांनी राजकारणाच्या आखाड्यात उतरण्याचे केलेले हे सूतोवाच असल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यातील भूमिपुत्र असलेले विजय चौधरी निवडणुकीत उभे राहिल्यानंतर कसे चित्र असेल, याचा अंदाज ग्रामीण भागात आतापासूनच बांधला जात आहे. जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याच्या शक्यतेसंदर्भात त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी अद्याप ठोसपणे भूमिका मांडताना दिसत नाहीत.

मध्यंतरी सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांच्या नावाचीही चर्चा होती. भाजपकडून सध्या विशेषतः लोकसभेसाठी वातावरणनिर्मिती केली जात असताना विजय चौधरी यांनी व्यक्त केलेल्या त्यांच्या विचारांना राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे. भाजपमध्ये उमेदवारी देताना नेहमीच धक्कातंत्राचा वापर केला जातो. जळगाव लोकसभेसाठी अनेक नावे चर्चेत असताना अचानक उन्मेष पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली होती.

त्यामुळे आगामी निवडणुकीतही याच धक्कातंत्राचा वापर होण्याची शक्यता आहे. अर्थात, विजय चौधरी यांना अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाकडून ऑफर आलेली नसली तरी त्यांनी व्यक्त केलेली इच्छा पाहता, भाजपकडून काय निर्णय घेतला जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, यासंदर्भात विजय चौधरी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT