exam
exam exam
जळगाव

बारावी परीक्षा रद्द..गुण निर्धारण तर होईल; मूल्यमापनाबाबत संभ्रम

सचिन जोशी

जळगाव : दहावीपाठोपाठ बारावीची परीक्षा रद्द (Exam cancel) करण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे एकीकडे गुण (Points) निर्धारणाचा प्रश्‍न विविध निकषांद्वारे निकाली निघत असला तरी न्याय्य मूल्यमापनाबाबत संभ्रम कायम आहे. ऑनलाइन (Online) प्रक्रियेत थिअरी कशीबशी समजून घेणाऱ्या विशेषत: विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना (Student) प्रॅक्टिकलचा अनुभवच आलेला नाही, त्याचे काय, हा मोठा प्रश्‍न शिक्षण विभागासमोर कायम आहे.

(twelfth exam cancellation marks confusion in assessment)


कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांसमोर अभूतपूर्व संकट आले असून, त्यात शिक्षणक्षेत्रही कमालीचे प्रभावित झाले आहे. सर्वच वर्गांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा व पर्यायाने करिअरच्या वाटचालीचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. २०२० वर्ष वाया गेल्यानंतर यंदा पुन्हा फेब्रुवारीपासून कोरोनाचा संसर्ग वाढत गेला व दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची दुर्दैवी वेळ आली.

बारावीची परीक्षा रद्द
दहावीच्या विद्यार्थ्यांना नववी व दहावीतील अंतर्गत गुणांच्या मूल्यमापनावर गुण दिले जाणार आहेत. त्याच धर्तीवर आता बारावीची परीक्ष रद्द झाल्याने या वर्गातील विद्यार्थ्यांचेही गुण निर्धारण होऊ शकेल.

अडचणींचा डोंगर
दहावीतील गुण निर्धारणापेक्षा बारावीचे गुण निर्धारण अत्यंत क्लिष्ट होऊ शकते. सर्व निकष ठरवून गुणांकन दिले तरी बहुतांश विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याचीच शक्यता अधिक आहे.

प्रात्यक्षिकांचे काय करणार
अकरावी व बारावीतील अंतर्गत गुणांच्या मूल्यमापनानुसार बारावीचे गुण निर्धारण केले जाईल. गुणांकन हा वेगळा विषय आहे. मात्र, या काळात बारावीच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग झाले, काहींनी ते ॲटेंड केले, तर काही या शिक्षणापासूनही वंचित राहिले. मात्र, खरा प्रश्‍न प्रात्यक्षिकांचा आहे. विशेषत: विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके अनिवार्य असतात. पुढे इंजिनिअरिंग अथवा मेडिकलला प्रवेश घ्यायचा झाल्यास प्रॅक्टिकलचे महत्त्व खूप आहे; परंतु अकरावी आणि बारावीतही एकही प्रॅक्टिकल न केलेल्या विद्यार्थ्यांचे पुढे कसे होणार, हा प्रश्‍नच आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांनाही विविध निकषांच्या आधारे गुण दिले जातील. प्रत्यक्षात परीक्षाच झालेली नसल्याने अशा गुणांचे निर्धारण कसे होणार? अकरावी व बारावीच्या स्तरावर मूल्यांकन केले तर अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ शकतो.
-चंद्रकांत भंडारी, शिक्षण समन्वयक

शिक्षण विभागाने दहावीप्रमाणेच बारावीतील विद्यार्थ्यांचेही आरोग्यासोबत शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून योग्य ते निकष निर्धारित करून गुणांकन केले जाईल. ऑनलाइन शिक्षण झाले, पण प्रात्यक्षिके होऊ शकली नाहीत. त्याचाही शासन पुढच्या वर्गात प्रवेश देताना, दिल्यानंतर विचार करेलच.
-डॉ. जगदीश पाटील
सदस्य, महाराष्ट्र पाठ्यपुस्तक अभ्यास मंडळ

विद्यार्थ्यांना विविध निकषांच्या आधारे गुण मिळाल्यानंतर त्यांची पुढच्या वर्गातील प्रवेशाची स्थिती स्पष्ट होईल. बारावीनंतर प्रत्येक शाखेत प्रवेश घेताना प्रवेश परीक्षा देणे आवश्‍यक बनले आहे, त्यामुळे गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकेल.
-नंदलाल गादिया
संचालक, महावीर क्लासेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT