Vijay Gosavi, Chetan Rane Sakal
जळगाव

घराची दप्तरी नोंद करण्यासाठी लाच

जळगावात सहकार अधिकाऱ्यांसह दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

जळगाव - नुकत्याच खरेदी केलेल्या घराची दप्तरी नोंद करून ताबा पावती देण्याच्या मोबादल्यात पाच हजाराची लाच मागणाऱ्या उपनिंबधक सहकार अधिकाऱ्यासह सहाय्यक सहकार अधिकारी यांच्यावर लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी एकच खळबळ उडाली.

तक्रारदार यांनी सिंधी कॉलनी भागात घर खरेदी केले आहे. खरेदी केलेल्या घराची दप्तरी नोंद करून त्याबाबतची ताबा पावती देण्याच्या मोबादल्यात उपनिंबधक सहकारी संस्थेत काम करणारे सहकार अधिकारी विजय सुरेशचंद्र गोसावी (वय ५४ रा. आशा बाबा नगर) आणि सहाय्यक सहकार अधिकारी चेतन सुधाकर राणे (वय ४८, रा. गणेश कॉलनी, जळगाव) यांनी पाच हजाराच्या लाचेची मागणी केली. लाच द्यायची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात संपर्क करून या बाबत लेखी तक्रार केली.

तक्रारीची चौकशी केल्यानंतर पोलिस उपअधीक्षक सतीष भामरे यांच्यासह पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, निरीक्षक एन. एन. जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, शैला धनगर, मनोज जोशी, जनार्दन चौधरी, सुनील शिरसाट, प्रवीण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर आदींच्या पथकाने लाचेची रक्कम स्वीकारताना दोघांना ताब्यात घेतले. संशयितांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"‘तू मेरा दिल, तू मेरी जान’ म्हणत रियान परागची उदास वैभव सूर्यवंशीला जादू की झप्पी; Video Viral, एकदा नक्की पाहाच नेमकं काय घडल?"

Yavatmal: पीककर्ज वाटपाची गती मंदावली; आतापर्यंत 21 टक्के वाटप; दोन हजार 200 कोटीचे उदिष्ट

Amravati: शासकीय कामासाठी खासगी आयडीचा वापर; चौकशीचा अहवाल एटीसींकडे : गृहपालाच्या अडचणीत वाढ

पाणी वाचवा! एक लीटर पाण्यात अंघोळ, RSSच्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देत असल्याचा VIDEO VIRAL

IPL 2026 Final, RCB vs GT live: अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला! दुसऱ्या ट्रॉफीसाठी बंगळुरू-गुजरात आमने-सामने; कुठे अन् कधी पाहाणार मॅच?

SCROLL FOR NEXT