girna dam  esakal
जळगाव

Jalgaon News : ‘गिरणा’तून पिण्यासाठी आवर्तन सुटले; पाण्याचा गैरवापर करताना आढळून आल्यास कारवाई

गिरणा धरणातून दोन हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र अग्रवाल यांनी सांगितले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : गिरणा पट्ट्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. ९) सकाळी सहाला गिरणा धरणातून दोन हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र अग्रवाल यांनी सांगितले.

या आवर्तनमुळे भडगाव, पाचोरा शहरांसह १९० गावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. (Two thousand cusecs of water was released from Girna Dam jalgaon news)

गिरणा धरणातून डिसेंबर महिन्यात पिण्याच्या पाण्यासाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले होते. दोन महिन्यांच्या खंडानंतर गिरणा पट्ट्यात पाणीटंचाईने डोके वर काढले होते. त्यामुळे लोकप्रतिनिधींकडूनही आर्वतन सोडण्याची मागणी होत होती.

त्यानुसार, गिरणा धरणातून दुसरे आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी (ता. ९) सकाळी सहाला दोन हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले. हे आवर्तन कानळदा (ता. जळगाव) पर्यंत सोडण्यात येणार आहे.

भडगावला पुढील तीन दिवसात पाणी पोहोचण्याची शक्यता आहे. यासाठी १ हजार ४०० दशलक्ष घनफूट पाणी लागणार आहे. हे पाणी बिगर सिंचनासाठी सोडण्यात आले आहे. त्यामुळे या पाण्याचा कोणीही गैरवापर करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा देवेंद्र अग्रवाल यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Cleanliness: 'मुंबईला स्वच्छ शहराचा किताब का मिळू नये?' उच्च न्यायालयाचे महापालिकेला फटकारे, इंदूरचा आदर्श घेण्याचे निर्देश

Shirala Mini Konkan Monsoon Tourism : लोणावळा-महाबळेश्वर विसरा! शिराळ्याचं 'मिनी कोकण' धुक्यात न्हालं; विकेंडला पर्यटकांची तुफान गर्दी, कास पठारसारखं खुललं सौंदर्य

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा इशारा; सातारा, सोलापूरसह तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट

Climate Change & Sleep: हवामान बदलाचा झोपवर परिणाम! भारत ठरतोय हॉटस्पॉट; शारीरिक, मानसिक आरोग्याला मोठा धोका

Income Tax 2026: TDS, TCS आणि Advance Tax म्हणजे नेमकं काय? फरक समजून घ्या नाहीतर भरावा लागू शकतो मोठा दंड

SCROLL FOR NEXT