somnath ahire  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : दुचाकी- मोटारसायकल चोर अटकेत

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : जळगाव-अजिंठा रेाडवर चक्कर येऊन खाली पडलेल्या दुचाकीस्वारास मदत न करता त्याच्या खिशातून मोबाईल व दुचाकी घेवुन पळ काढणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. सोमनाथ अहिरे असे चोरट्याचे नाव आहे. (Two wheeler motorcycle thief arrested by police jalgaon crime news)

चिंचोली येथील रहिवासी ग्रामस्थ ईश्वर सुभाष घुगे (वय ४४) हे मंगळवार(ता.१४) रोजी मेहरुण येथील धार्मिक कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम संपल्यावर आपल्या दुचाकी (एम.एच.१९.सी.बी.४११४) ने चिंचोली येथे घराकडे जात असताना रेमंड चौकात त्यांना अचानक चक्कर येऊन पडले.

त्यांनी तशीच दुचाकी सोडून खालीपडून गेल्याने त्यांना मदत करण्याऐवजी चोरट्याने चक्क खिशातील मोबाईल काढून घेत दुचाकी घेवुन पळ काढला होता. शुद्धीत आल्यावर ईश्वर घुगे यांनी पोलिसांत तक्रार दिल्यावरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.

शनिवार (ता.२५) रोजी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना गुप्त बातमीदाराने कळविले की कुसुंबा(ता.जळगाव)येथील सोमनाथ भागवत अहिरे हा मोटारसायकल वापरत असून ती चोरीची असल्याची माहिती दिली.

सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, गणेश शिरसाळे, अल्ताफ पठाण, किशोर पाटील, योगेश बारी, नाना तायडे यांच्या पथकाने कुसुंबा येथून सोमनाथ अहिरे यास ताब्यात घेतले. खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली देत मोटारसायकल काढून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nipah Virus Alert : सावधान! पश्चिम बंगालमध्ये आढळले ‘निपाह’ विषाणूचे रूग्ण; केंद्र सरकारकडून हालचालींना वेग

Pune News : सिंहगड रोड परिसरातील नागरिकांचा एल्गार; बिनविरोध निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे दार ठोठावले!

Bhogi Horoscope : भोगीनंतर 'या' 5 राशींचे भाग्य बदलणार; अचानक मिळतील पैसे, रखडलेली कामे पूर्ण होणार अन् ऑफिसमधून मिळेल खुशखबर

PMC Abhay Yojana : पुणेकरांनो घाई करा! अभय योजनेचे शेवटचे ७२ तास शिल्लक; ७५ टक्के सवलत गमावू नका!

Vande Bharat Sleeper Train: प्रतीक्षा संपली! देशातील पहिली ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ शनिवारपासून धावणार

SCROLL FOR NEXT