Uddhav Thackeray  esakal
जळगाव

Uddhav Thackeray In Jalgaon : पुतळ्याची उंची ठीक, पण कामाची उंची कधी गाठणार? जळगावातून ठाकरेंचा केंद्र सरकारवर घणाघात

रोहित कणसे

आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्ष उभारणीसाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. उद्धव ठाकरे हे आज (१० सप्टेंबर) जळगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी जळगाव महापालिकेच्या आवारात उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण ठाकरेंच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमात बोलताना ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. गुजरात मध्ये उभारण्यात आलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीवरून देखील उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की. सध्या केंद्र सरकार हालतं आहे. मला महापौर, उपमहापौरांचा अभिमान आहे, कारण पुतळा कोणी कोणाचाही लावू शकतो, पण पोलादी पुरूष म्हणून उपाधी जनतेने दिली ते सरदार वल्लभाई पटेल यांचा पुतळा महापालिकेच्या आवारात उभारलात आणि त्याच्या आनावरणाची संधी मला दिली, याबद्दल आभार मानतो.

सरदार वल्लभभाईं पटेल हे दूरदृष्टी असलेले व्यक्ती होते. तेव्हा त्यांनी आरएसएसवर बंदी देखील आणली होती. त्या व्यक्तीला स्वतंत्र्यप्रेम, आणि देशप्रेम काय हे कळत होतं. यांचा जगातला सगळ्यात मोठा पुतळा कुठे उभा केला आहे तुम्हाला माहिती आहे. पुतळ्याची उंची ठीक आहे, पण कामाची उंची कधी गाठणार? वल्लभभाईंनी काम केलं त्याची उंची तुम्ही गाठा असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

सरदार पटेलांनी १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा भारतात सामिल करून घेतला. ती तारीख काही दिवसात येत आहे. विशेष म्हणजे त्या दिवशी जीनांचं निधन झालं होतं, तेव्हा काही जणांनी कारवाई पुढं ढकलण्याची मागणी केली. पण सरदार पटेलांनी सांगितलं, आज म्हणजे आजच. त्यांनी फौजा घुसवल्या, रझाकारांचे अत्याचार थांबवले आणि मराठवाडा अभिमानाने देशात सामिल करून घेतला. आज आम्ही पुतळे उभारतोय जरूर पण जशी वल्लभभाईंनी मराठवाड्यात कारवाई केली तशी कारवाई मणिपूरमध्ये करायची हिंमत नाही आणि हे स्वतःला पोलादी पुरूष म्हणवून घेत आहेत असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : पुणे शहरातील अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT