Uddhav Thackeray Slam BJP RSS in Jalgaon Sabha Over Statue Of unity Maharashtra Politics rak94 
जळगाव

Uddhav Thackeray : 'भाजप, आरएसएसला आदर्श व्यक्तीमत्व घडवता आली नाहीत, त्यांनी फक्त...'; उद्धव ठाकरेंचा घणाघात

रोहित कणसे

राज्यातील आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमिवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून नव्याने पक्षबांधणीसाठी मैदनात उतरले आहेत. यादरम्यान आज जळगाव दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप यांच्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देखील कडाडून टीका केली आहे.

जळगाव येथे उद्धव ठाकरे यांनी सरदार वल्लभाई पटेल यांच्या पुतळ्याचे आनावरण केलं. यानंतर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, यामधल्या काळात गुजरातमध्ये वल्लभभाईंचा सगळ्यात उंच पुतळा उभारण्यात आला, आज भाजपनेतर नाहीच नाही, त्यांच्या मातृसंस्था (आरएसएस) ने देखील आदर्श मानावं अशी व्यक्तीमत्वचं उभी केली नाहीत. मग केलं काय, तर चोरीचं काम. इकडे वल्लभभाई चोरून घ्या तिकडे नेताजी सुभाषबाबू चोरून घ्या. आता तर माझे वडिल चोरायला निघालेत.

म्हणजे ज्यांचा स्वतंत्र्यलढ्यात सुतराम संबंध नव्हता अशी लोकं, या अदर्श लोकांच्या जोरावरती स्वतःची दहीहांडी करत आहेत. मुळात कतृत्व काही नाही. वल्लभभाईंचा पुतळा तीनशे फूट, हजार फूट बांधा, पण त्यांच्या कामाच्या उंचीच्या जवळपासही तुम्ही फिरकू शकत नाहीत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Ambegaon Crop Insurance: पावसाने दगा दिला तर आधार मिळणार; आंबेगावातील ६,८६३ शेतकऱ्यांनी घेतले पीकविम्याचे कवच

Purna River Crisis: कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्याने पूर्णा नदीचे पाणी वाहून गेले

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

SCROLL FOR NEXT