Banana farmers who are going to give a statement for the demand of getting crop insurance amount.
Banana farmers who are going to give a statement for the demand of getting crop insurance amount. esakal
जळगाव

Agriculture News : केळी विम्याच्या रकमेसाठी Ultimatum ; राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

रावेर : तालुक्यातील सुमारे आठशे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या केळी पीक विम्याची रक्कम विविध कारणांनी विमा कंपनीकडे अडकून पडली आहे, ती दिवाळीपूर्वी न मिळाल्यास ऐन दिवाळीतच तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलतर्फे केळीपीक विमा योजनेत मंजूर रक्कम खात्यात न आलेल्या शेतकऱ्यांची बैठक आज येथे घेण्यात आली. या वेळी अनेक शेतकऱ्यांनी बैठकीत विमा कंपनी व बँकेच्या होणाऱ्या त्रासाबद्दल अडचणींचा पाढा वाचला. त्यानंतर तहसीलदार कार्यालयात सर्व शेतकऱ्यांनी जाऊन नायब तहसीलदार संजय तायडे यांना निवेदन दिले.

अन्य केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळी पीकविम्याची भरपाई रक्कम मिळून २५ दिवस उलटले तरी देखील या ८०० शेतकऱ्यांना अनेक हेलपाटे मारूनही अजूनही भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग झाली नसल्याचेही श्री. कोंडे यांनी निदर्शनास आणून दिले. थकबाकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी वर्ग न झाल्यास ऐन दिवाळीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे सांगण्यात आले.(Ultimatum for banana insurance amount NCP warns agitation Jalgaon News)

या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, माजी पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, योगेश पाटील, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, शेख मेहमूद, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शेतकरी धीरज भंगाळे, गोपाळ भिरुड, रामभाऊ सोनवणे, रामदास भंगाळे, दिलीप सोनवणे यांसह तालुकाभरातून असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.

"पंचवीस दिवस उलटूनही केळी पीकविमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. आठवडाभरात रक्कम जमा न झाल्यास ऐन दिवाळीत सणाच्या दिवशीच आम्ही आंदोलन करू. पीकविमा रकमेपासून आठशे शेतकरी वंचित आहेत."

- सुनील कोंडे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी ओबीसी सेल, रावेर तालुका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT