crime news sakal
जळगाव

Jalgaon Crime : जारगावात अनधिकृत खतसाठा जप्त; कृषी विभागाच्या पथकाची धडक कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जारगाव (ता. पाचोरा) येथील मधुकर शंकर भोकरे यांच्या मालकीच्या गुदामात विनापरवाना अनधिकृत खतसाठा आढळून आला. (Unauthorized fertilizer stock seized in Jargaon jalgaon crime news)

बनावट रासायनिक व सेंद्रीय खताची गावोगावी, घरोघरी विनाबिलाने विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावरून कृषी विभागाने सापळा रचून छापा टाकला. त्यात विनापरवाना दोन लाख ३८ हजार रुपयांचा खतसाठा जप्त केला आहे.

जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे यांनी पाचोरा येथे येऊन उपविभागीय कृषी अधिकारी नंदकिशोर नाईनवाड, कृषी अधिकारी मारुती भालेराव, कृषी पर्यवेक्षक अविनाश चंदिले यांना सोबत घेऊन जारगाव येथील मधुकर शंकर भोकरे यांच्या मालकीच्या गुदामाची तपासणी केली असता, तेथे विनापरवाना अनधिकृत खतसाठा आढळून आला.

याबाबत गुदाम मालकाची विचारपूस केली असता, हे गुदाम काही दिवसांपूर्वी दीपचंद्र श्रीवास यांना भाड्याने दिल्याचे सांगितले. विनापरवाना व अनधिकृत खतसाठ्याबाबत दीपचंद्र श्रीवास यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून गुदाम व कंपनीचा परवाना मागितला असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. गुदामातून दोन लाख ३८ हजार ६२९ रुपयांचा ६.७८ मेट्रिक टन खतसाठा जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ही कारवाई विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

याबाबत रात्री उशीरापर्यंत खत नियंत्रण आदेश १९८५ व अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ नुसार पाचोरा पोलिस ठाण्यात क्र.१५४/२०२३ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खरीप हंगाम २०२३ मध्ये अनधिकृत, अवैध व विनाबिलाने बियाणे व खतांची खरेदी करू नये, तसेच अशा कृषी निविष्ठांची अनधिकृतपणे विक्री करीत असल्याचे दिसून आल्यास संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचा ०८९८३८३९४६८ भ्रमणध्वनी व दूरध्वनी ०२५७-२२३९०५४ या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक वाघ व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ठाकूर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT