uncleanliness in Bodvad esakal
जळगाव

जळगाव : बोदवडला ‘स्वच्छ सर्वेक्षणा’चे तीनतेरा

मिलींद वानखेडे

बोदवड (जि. जळगाव) : शहरातील स्वच्छतेच्या कार्याला गती मिळावी, यादृष्टीने प्रत्येक वॉर्डमधील स्वच्छतेच्या निकषांच्या आधारावर स्पर्धात्मक दृष्टीकोन ठेऊन स्वच्छ सर्वेक्षण अभियान (Clean Survey Scheme) राबविण्यात येते. मात्र, बोदवडला या अभियानाचे तीनतेरा वाजले असून, शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. विशेषत: हिदायतनगर, म्हसोबा मंदिर परिसर तसेच उर्दू शाळेजवळील शौचालयासमोर व बाजूला मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग आढळून येतात. (uncleanliness in clenliness survey in bodwad nagar panchayat jalgaon news)

शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या मागील गल्लीतील स्वच्छतागृहाजवळ मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य आढळून येते. त्यात पावसाळा सुरू असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशीच स्थिती अनेक चौकांची आहे. जनता बँकेसमोर नगरपंचायत प्रशासनाने कचराकुंडी ठेवली असूनही कचरापेटी फुटलेली आहे. यातून कचरा बाहेर पडून गटारीमध्ये जातो. यामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरून वाहते, तसेच हे ठिकाण बाजारपेठला लागून असल्याने हॉटेल व्यावसायिक मोठ्या प्रमाणात खरगटे, तेलकट कागद टाकतात.

फळविक्रेत्यांकडून देखील सडलेली फळे कचराकुंडीत फेकली जातात. शहरात काही भागांत गटारी जीर्ण झाल्या असून, कुठे खोल तर कुठे सरळ असल्याने सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. परिणामी, रस्त्यावर डबक्यामध्ये पाणी साचते तर याउलट परिस्थिती प्रभाग १४ मध्ये दिसून येते. या प्रभागात पावसाचे पाणी आले, की गटारीचे पाणी घरांमध्ये सुद्धा भरले जाते, तसेच शहरात पाच घंटागाड्या असून, काही भागात त्या दररोज जातात, नागरिकही घरातील गोळा केलेला कचरा घंटागाड्यांमध्ये टाकतात, परंतु दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणचा कचरा उचलला जात नाही. तरी प्रत्येक घंटागाडीबरोबर एक स्वच्छता कर्मचारी असतो.

प्रत्येक घंटागाडीला एका दिवसाला दोनशे रूपये डिझेलसाठी दिले जातात. पण यात काही गाडीवाले आपला ठरलेल्या भागात गाडी नेतात तर कधी दांडी मारतात. यावर नगरपंचायत प्रशासनाने बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. जे व्यावसायिक तसेच नागरिक शहरात घंटागाडीमध्ये कचरा न टाकता खुल्या जागेत अथवा कचरा पेटीत टाकतात. त्यांना नोटीस बजावणे गरजेचे आहे.

तसेच स्वच्छतागृहातील लाइट चोरीला जातात, यावर काही पर्याय काढून नगरपंचायत प्रशासनाने योग्य ती दखल घेण्याची गरज आहे, अन्यथा पावसाळ्यात या घटनेमुळे नागरिकाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. चौकट खर्च लाखोचा, तरीही स्वच्छतेचा अभाव नगरपंचायत प्रशासन घनकचरा योजनेतून साफसफाईवर एक महिन्यासाठी ८ लाख ५२ हजार ३७५ रुपये खर्च करत असूनही स्वच्छता परिपूर्ण होत नसेल तर याकडे नगरपंचायत प्रशासन व लोकनियुक्त नगरसेवक यांनी लक्ष घालून शहरातील केरकचरा व्यावसायिक व नागरिक यांनी घंटागाडीत टाकण्यासाठी प्रयत्न करावे व उघड्यावर बसण्याची तसेच शासकीय स्वच्छतागृहाचे नुकसान करणाऱ्यांवर कडक शासन करावे, तसेच शहर स्वच्छ सुदर बनविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT