union and state government help 15 lakh for children who lost their parents due covid19 sakal
जळगाव

जळगाव : कोरोनाने अनाथ बालकांना मिळणार १५ लाखांची मदत

अकराशे रुपये दरमहा मिळणार, प्रक्रिया अंतिम टप्प्यात

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कोरोनामुळे अनाथ झालेली बालके (दोन्ही पालक गमाविलेले) अठरा वर्षाची पूर्ण होताच त्यांच्या बॅंक खात्यात पंधरा लाखांचा निधी जमा झालेला असेल. बालसंगोपन योजनेअंतर्गत अकराशे रुपये दरमहा ७८३ बालकांना मिळतील. त्यापैकी ४२८ बालकांना ही रक्कम आगामी आठवड्यात मिळेल. उर्वरित बालकांना मार्च महिन्यात ही रक्कम मिळणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत २५९१ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मे-जूनमध्ये केंद्र व राज्य शासनानेही कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना आर्थिक मदत देण्याचा, त्याचे समुपदेशन करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून या बालकांचे जीवनमान चांगले राहिले. अज्ञान असतील तर त्यांना दत्तक घेणे, किंवा त्यांच्या नातेवाइकांकडे ठेवून बालकांना आर्थिक मदत करणे, शिक्षणासाठी साहित्य देणे, शुल्कांची व साहित्याची तरतूद सामाजिक संस्थांच्या मदतीने करणे आदी बाबींची तरतूद करण्यास सांगण्यात आली होती.

राज्य शासनाने दोन्ही पालक गमाविलेल्या अनाथ मुलांच्या खात्यावर पाच लाख रुपयांची एफडी करून दिली आहे. २७ पैकी २० मुलांना ती एफडी देण्यात आली. ७ मुलांना आगामी आठवड्यात एफडीची रक्कम देण्यात येणार आहे. केंद्र शासनाकडूनही अनाथ मुलांसाठी १० लाखांची एफडी केली जाणार आहे. त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. लवकरच २७ मुलांच्या नावे दहा लाखांची एफडी दिली जाईल. राज्याचे पाच लाख व केंद्राचे दहा असे एकूण १५ लाख रुपयांची एफडी अनाथ मुलांकडे असेल. ते जेव्हा सज्ञान होतील (१८ वर्षाचे) तेव्हा त्यांना या एफडीची रक्कम काढून शिक्षण, व्यवसाय, उद्योगासाठी वापरता येणार आहे. जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या बालसंरक्षण समितीतर्फे कोरेानाने दोन्ही पालक गमाविलेल्या २७ बालकांपैकी २४ बालकांना अनाथ असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

११०० दरमहा मिळणार

जिल्ह्यातील ७८३ मुलांनी एक पालक गमाविलेला आहे. त्या प्रत्येकाला अकराशे रुपये दरमहा मिळणार आहेत. याचीही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. त्यापैकी ४२८ मुलांना फेब्रुवारीअखेर तर उर्वरितांना मार्चपासून अकराशे रुपये मिळतील. ही रक्कम मुले सज्ञान होईपर्यंत मिळणार आहे. जिल्हा कृती दलाच्या नियंत्रणाखाली असलेल्या प्रत्येक तालुक्यातील समिती शासन आपल्या दारी उपक्रमांतंर्गत कोविडमुळे प्रभावित झालेल्या महिला व बालकांच्या समस्या सोडविते.

आकडे बोलतात...

  • दोन्ही पालक गमावलेले बालक : २७

  • एक पालक गमावलेले : ७५४

  • बालसंगोपन योजनेचे आदेश दिलेले बालक : ६६९

  • कोरोनामुळे विधवा झालेल्या महिला : ४३४

कोरोनाने अनाथ झालेली २७ बालके आहेत. त्यांना राज्य शासनाकडून पाच लाख तर केंद्र शासनाकडून दहा लाख अशा वेगवेगळ्या एफडी मिळतील. वयाच्या १८ वर्षानंतर ही मुले ती रक्कम खर्च करू शकतील.

- योगेश मुक्कावार, जिल्हा बालसरंक्षण अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT