Rain esakal
जळगाव

Unseasonal Rain: जिल्ह्यात आजपासून पुन्हा अवकाळीचे ‘संकट’! शेतकऱ्यांनी गहू, मका, हरभरा काढून घेतलेला बरा

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : अवकाळी पावसाने ५ ते ७ मार्चदरम्यान तडाखा दिल्याने गव्हाचे मोठे नुकसान झाले होते. त्यापाठोपाठ आता सोमवार (ता. १३)पासून ते १७ मार्चदरम्यान पुन्हा अवकाळी पावसाचे संकट ‘आ’ वासून उभे असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडणार असल्याचे संकेत आहेत. पूर्व विदर्भासह तेलंगणा, केरळमध्येही अशीच स्थिती असणार आहे. (Unseasonal raoin crisis again from today in district jalgaon news)

‘पश्‍चिमी विक्षोभ’, आणि ‘अल निनो’ यामुळे पावसाचे वातावरण तयार होऊन पाऊस पडेल, असा अंदाज हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांनी व्यक्त केला आहे.

समुद्रातील तापमान वाढल्याने पावसाचे वातावरण तयार होत आहे. यामुळे अवकाळी पाऊस पडेल. जिल्ह्यात काही ठिकाणी १३ ते १५, तर काही ठिकाण १४ ते १७ मार्चदरम्यान पावसाची शक्यता आहे.

रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, दादर ही पिके आता परिपक्वतेच्या अवस्थेत आहेत. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने सर्वाधिक नुकसान एरंडोल, धरणगाव, चोपडा तालुक्यांत झाले. जिल्ह्यात एकूण २५१ गावे बाधित झाली होती. १३ हजार ३५४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यात कोरडवाहू हरभरा, बाजरी, गहू, मका, ज्वारी, सूर्यफूल, कांदासह केळी, पपई, मोसंबी, लिंबूचा समावेश होता.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

कापूस पडून आणि...

आता पुन्हा अवकाळीचे संकट असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. अगोदरच शेतकऱ्यांचा ८० टक्के कापूस घरात पडून आहे. कापसाला दहा ते १३ हजारांचा दर मिळण्यासाठी शेतकरी कापूस विकत नसल्याचे चित्र आहे.

सध्या साडेसात ते आठ हजारांचा कापसाला दर आहे. मात्र, अधिकचा भाव मिळेल, या आशेवर शेतकऱ्यांनी घरात कापूस साठविला आहे. खरिपातील उत्पादनखर्चही अजून निघालेला नाही. आता रब्बी हंगामावर अवकाळीचे दुसऱ्यांदा संकट येत आहे. यामुळे करावे तरी काय, असा प्रश्‍न शेतकऱ्यांपुढे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहली, शुभमन गिलचे शतक, टीम इंडियाचा पहिल्या वन डेत दणदणीत विजय; मालिकेत आघाडी

Praniti Shinde: दुष्काळ जाहीर केला, पण आर्थिक मदत कुठे?’; मंगळवेढ्यात खासदार प्रणिती शिंदेंचा सरकारवर निशाणा

Nagpur Crime: साक्ष दिल्याचा बदला घेण्यासाठी पाठलाग; हद्दपार आरोपीने तेलमालिश करणाऱ्यावर चाकूने केले तीन वार

Latest Marathi News Live Update : दिवसभरात काय घडलं? देशविदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीची Century! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; ७४ चेंडूंत इतिहास भूगोल बदलला...

SCROLL FOR NEXT