Vacancies in colleges will be filled Recruitment ban relaxed on terms and conditions jalgaon Sakal
जळगाव

अनुदानित महाविद्यालयातील रिक्त पदे भरली जाणार

भरतीवरील बंदी अटी-शर्तींवर शिथिल

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील रिक्त होणाऱ्या प्राचार्य, साहाय्यक प्राध्यापक व अन्य पदांवरील भरतीसाठी कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडत नसल्याने ही पदे भरण्यासंबंधी शासनाच्या वित्त विभागाने लादलेली अट शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील तीन हजारांवर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार आहे.उच्च शिक्षण संचालनालयाच्या आधिपत्याखालील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर पदांपैकी उच्चस्तरीय सचिव समितीने ४७३८ पदे भरण्यास मान्यता दिली आहे.

पैकी १६७४ पदे भरण्यात आली आहेत. त्यातील रिक्त प्राचार्यांच्या पदांनाही मान्यता देण्यात आली होती, मात्र वित्त विभागाने या पदांच्या भरतीवर निर्बंध आणले होते. प्राचार्य संवर्गातील रिक्त पदे, प्राचार्य पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर होणारी पदे, तसेच साहाय्यक प्राध्यापक संवर्गातील विद्यार्थी संख्येच्या आधारे अनुज्ञेय होणारी पदे भरण्यास शासनाने गेल्या नोव्हेंबरमध्ये अध्यादेश काढत काही अटी-शर्तींवर मान्यता दिली आहे. त्यामुळे या पदांसाठी प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार आहे.

जी रिक्त पदे आहेत, ती सर्व पदे भरतीची प्रक्रिया सुरू झाली पाहिजे. विद्यार्थी संख्या कायम आहे, उलट वाढतेच आहे. कामही त्यानुसार वाढते. त्यामुळे संवर्गातील सर्वच रिक्त पदांची भरती केली पाहिजे.

- प्रा. अशोक राणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT