Various resolutions related to marriage were passed unanimously in Gurjar Samaj meeting esakal
जळगाव

Jalgaon News : लग्नात आहेर, सत्कार सोहळ्यांना फाटा; बैठकीत विविध ठराव एकमताने मंजूर

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथे संपन्न झालेल्या गुजर समाजबांधवांच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन ठराव करण्यात आले. तसेच रावेर येथील सभेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावांशी बांधली राहून त्या निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. (Various resolutions related to marriage were passed unanimously in Gurjar Samaj meeting at Pachora jalgaon news)

ध्येय करिअर ॲकॅडमीत गुजर समाजबांधव व भगिनींची बैठक झाली. या बैठकीत ८ एप्रिलला रावेर येथील सभेमध्ये पारित झालेल्या तीन महत्त्वपूर्ण निर्णयांचे काटेकोरपणे पालन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

तसेच लग्नात आहेर देव-घेव नसावी, वधूकडे महिलांनी हळद घेऊन जाऊ नये, रुपया घालण्यास महिला जाणार नाहीत, निधन घरी चहा साखर घेऊन जाऊ नये, मुलीकडून गोड पदार्थ देणे बंद करावे, साखरपुडा करू नये, आग्रह झाल्यास मर्यादित लोकांपुरता साखरपुडा असावा, त्यासाठी आलेल्या महिलांना साड्या देऊ नये, लग्न समारंभात सत्कार करू नयेत, पत्रिका छापणे व वाटणे तसेच घ्यावयास जाणे या पद्धती बंद कराव्यात, सोशल मीडिया, मेसेज अथवा थेट कॉल करून निमंत्रण द्यावे, यावर चर्चा व होऊन निर्णय झाले. याचा प्रचार व प्रसार करण्याचा निर्णय झाला.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

गुर्जर समाजबांधवांच्या गावांत संपर्काची जबाबदारी बी. के. पाटील, डॉ. अविनाश पाटील यांच्यावर सोपविण्यात आली. या निर्णय ठरावांचे पालन न करणाऱ्या समाजबांधवांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य न करण्याचा ठराव झाला.

या बैठकीस डॉ. जयंतराव पाटील, प्रकाश पाटील, डॉ. स्वप्नील पाटील, संदीप महाजन, डी. एल. पाटील, पी. डी. पाटील, सू. ची. पाटील, विनोद पाटील, गोविंद पाटील, अतुल महाजन, प्रल्हाद पाटील, राजाराम महाजन, डॉ. अविनाश पाटील, आशिष पाटील, मनोज पाटील, जितेंद्र महाजन, दीपक पाटील, अशोक पाटील, ईश्वर देशमुख, बाबुलाल पाटील, गोविंद पाटील, प्रतीक महाजन, मेघा महाजन, ज्योती देशमुख, सुनीता पाटील, डॉ. सोनाली पाटील, सुवर्णा पाटील, डॉ संगीता पाटील, रेखा महाजन, शीतल महाजन, शीतल पाटील, तृप्ती पाटील, स्वाती पाटील, अर्चना महाजन, स्वाती महाजन, संजीवनी पाटील आदी उपस्थित होते.

समाजाचा आदर्श

हल्ली लग्नसोहळ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. त्यातच आहेर देवाण-घेवाण होत असल्याने आर्थिक ओढाताण, रुसवे-फुगवे, यासारख्या अडचणींना दोन्हीकडील मंडळींना सामोरे जावे लागते. तसेच लग्नात होणाऱ्या सत्कार सोहळ्यांमुळे पाहुणे मंडळींचा वेळ खर्ची होते. त्यामुळे अशा रुढी-परंपरांना फाटा देऊन एक चांगला आदर्श समाजाने इतर समाजापुढे ठेवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iranian Oil Tanker: होर्मुझ ओलांडल्यानंतर समुद्रात मोठा खेळ; भारताकडे निघालेल्या इराणी जहाजाचा यू-टर्न, चीनला जात आहे तेल

IAS transfer news : कोल्हापूर जिल्हाधिकारी, झेडपी सीईओ, महापालिका आयुक्तांची बदली; एकाच दिवशी धडाधड बदल्यांच्या आदेशाने चर्चांना उधाण

Konkan Mango Farmers : कोकणच्या हापूस उत्पादकांसाठी मोठी बातमी! राजू शेट्टींच्या मध्यस्थीनंतर व्यापाऱ्यांनी घेतला 'हा' निर्णय, वाशी APMC मधील बैठकीत काय ठरलं?

Latest Marathi News Live Update : मुंबई महापालिकेतील हजार कोटींच्या टेंडर्सवर मोठा निर्णय

Gas Cylinder Line : भर उन्हात नागरिकांच्या सिलिंडरसाठी रांगा; तुटवड्यामुळे ग्राहकांचे हाल, तब्बल ४६०० ग्राहकांची नोंदणी

SCROLL FOR NEXT