jalgaon  sakal
जळगाव

पोलिस उपमहानिरीक्षकांचे व्हिजिलन्स पथक सक्रिय

पाच जिल्ह्यांसाठी पोलिस निरीक्षक रोहम यांची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा

जळगाव: जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक ग्रामीण आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांसाठी पोलिस उपमहानिरीक्षकांच्या सूचनेवरून विशेष व्हिजिलन्स पथकाची नियुक्त करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बापू रोहम या पथकाचे प्रमुख असून, वरिष्ठ स्तरावर येणाऱ्या गुप्त माहितीच्या आधारे थेट उपमहानिरीक्षकांच्या सूचनेवरून हे पथक कारवाई करणार आहे.

नशिक परिक्षेत्रात येणाऱ्या पाच जिल्ह्यांतील अवैध धंदे, स्थानिक पातळीवर तक्रारी होऊनही कारवाई न होणारी प्रकरणे आणि खासकरून गुप्तचर विभाकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारावर हे पथक कार्यरत राहणार आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात होणारी तस्करी, स्थानिक अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे होणारे उद्योग आणि अवैध धंद्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी या पथकाची नियुक्ती झाली असून, पोलिस उपमहानिरीक्षकांनाच या पथकातील अधिकाऱ्यांचे थेट रिपोर्टिंग राहणार आहे.

कुठल्याही प्रकरणात थेट हस्तक्षेप करून हे पथक कार्यवाही करू शकेल, अशा खास सूचना पारित झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार जळगाव स्थानिक गुन्हे शाखेतून नुकतीच बदली झालेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक बापू रोहम यांची पथकप्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे.

स्वतंत्र यंत्रणा

जिल्ह्यातील खडान्‌ खडा माहितीसाठी सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक कर्मचाऱ्यांची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत करण्यात येत असून, माहितीची खात्री होताच तातडीने कारवाई होऊन त्यांची संपूर्ण माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांना कळविण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

Udgir Gutkha Seized : पाठलाग करून साडेदहा लाखांचा गुटखा पकडला; एक चारचाकी तर एक आरोपी ताब्यात

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Yermala News : कलाकेंद्र चालकाचा नियमांचा भंग; महाकाली कला केंद्राबाबत जिल्हाधिकारी यांचा मोठा निर्णय

Mumbai: चालत्या ट्रेनमधून केसांना धरत तरुणीला बाहेर ओढलं नंतर...; महिलेचं धक्कादायक कृत्य, मुंबई लोकलमधील राड्याचा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT