Villagers will go on hunger strike in connection with illegal tree felling jalgaon esakal
जळगाव

Jalgaon News : अवैध वृक्षतोड प्रकरणी ग्रामस्थ करणार उपोषण; ग्रामस्थांचा वन विभागाला इशारा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : वेल्हाळे येथील वन जमिनीवर अवैध वृक्षतोड प्रकरणी मुक्ताईनगर वनक्षेत्रात गुन्हा दाखल आहे. चुकीच्या पद्धतीने चौकशी करून हे प्रकरण निकाली काढण्यात आल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. (Villagers will go on hunger strike in connection with illegal tree felling jalgaon news)

याप्रकरणी संबंधितांची चौकशी व तत्काळ निलंबनासाठी वेल्हाळे येथील बाजार समितीचे संचालक योगेश पाटील व ग्रामस्थांनी मंगळवार (ता. ५) पासून बेमुदत उपोषणाचा इशारा वन विभागाला दिला.

वेल्हाळे गावाजवळ वन खंड क्रमांक ५०५ व ५०६ आहे. दीपनगर वीज निर्मिती प्रकल्पाने यापैकी काही क्षेत्र विविध अटींवर घेतले आहे. तेथे कोळशाची राख साठविण्यासाठी साठवण तलाव तयार केला. यासाठी पाइपलाइन टाकली आहे.

या कामासाठी वन क्षेत्रात १५ ते २० फूट रस्ता तयार करताना वृक्षतोड करण्यात आली. याप्रकरणी वेल्हाळे येथील योगेश पाटील व ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण केले होते. त्यावेळी मुक्ताईनगर वन अधिकाऱ्यांनी चौकशीचे आश्वासन दिले. पण नंतर दाखल वन गुन्ह्याची चौकशी चुकीच्या पद्धतीने करून हा गुन्हा निकाली काढल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

याप्रकरणातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून निलंबन करावे, या मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात येणार आहे. आंदोलनाची दखल न घेतल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"BJP अन् काँग्रेसवाले मले हलक्यात घेते होते, आता विधानसभा लढवणार! पोट्ट्यांनी ठरवलं..."; कराळे मास्तरांचा थेट इशारा

Pune Roadwork: खोदकामामुळे जुन्या वृक्षांना धोका; पाषाण-सूस रस्त्यावरील स्थिती, कंत्राटदाराचा निष्काळजीपणा, मुळ्या पडल्या उघड्या

Pune News: मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पात निकृष्ट काम; ठेकेदाराचा खुलासा पुणे महापालिकेने फेटाळला

Latest Marathi News Update : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका घ्या; सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Madha Politics: माढ्याची खासदारकी राष्ट्रवादीला सोपी! पदवीधरच्या निकालाचा परिणाम; दोन आमदार पक्षासोबत तर दोन भाजपच्या जवळ

SCROLL FOR NEXT