Crisis of water  esakal
जळगाव

भर पावसाळ्यातही धानोरेकरांची पाण्यासाठी वणवण

12 दिवसांनंतर होतोय पाणीपुरवठा

सकाळ वृत्तसेवा

धानोरा (ता. चोपडा) : चोपडा तालुक्यातील मोठ्या गावांपैकी धानोरा हे एक गाव. येथील लोकसंख्या दहा हजारावर गेली आहे. गावात गेल्या दोन महिन्यापासून पिण्याच्या पाण्यासाठी महिलांसह आबालवृद्धांना रात्री बेरात्री हंडा घेऊन वणवण करावी लागते आहे. यावर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या ढिम्म कारभारावर रोष व्यक्त केला आहे. भर पावसाळ्यात देखील गावात पाणीटंचाई निर्माण झाली असून प्रशासनाचे मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.

धानोरा गावात दोन महिन्यांपासून भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावात पाणीपुरवठा करण्यासाठी आठ ते नऊ कूपनलिका आहेत. परंतु त्यांची पाणी पातळी खालावल्याने पाणी टाकीत जाण्यास विलंब होत असल्याचे सांगण्यात येते. कधी कूपनलिका खराब होतात तर कधी त्यांचा विद्युतपुरवठा खंडित केला जातो, असे एक ना अनेक उत्तरे ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थांना देत असतात.

दहा- बारा दिवसांनी पाणीपुरवठा

गावात भीषण पाणीटंचाई जाणवत असून दहा बारा दिवसांनी पाणीपुरवठा केला जात असल्याने ग्रामस्थांना भर पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गावातील सार्वजनिक नळ बंद असल्याने गावाजवळील शेतातून ग्रामस्थ पाणी वाहताना दिसत आहेत.

गावातील सार्वजनिक नळ बंद

गावात ठिकठिकाणी सार्वजनिक नळ बसविण्यात आले असून या ठिकाणी ग्रामस्थ पाणी भरत असतात. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून हे सार्वजनिक नळ बंद करण्यात आले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या म्हणण्यानुसार हे नळ बंद झाल्यास गावातील पाणीपुरवठा सुरळीत सुरू होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र हे सार्वजनिक नळ बंद करूनसुद्धा पाण्याची परिस्थिती जैसे थे असल्याने ग्रामपंचायतीने हेतुपुरस्सर गावात पाणीटंचाई निर्माण करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

ग्रामपंचायतीचे टँकर जाते भाडोत्री

ग्रामपंचायतीच्या चौदावा वित्त आयोगाच्या निधीतून एक ट्रॅक्टर व टँकर घेण्यात आले आहे. गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्यावरसुद्धा या टँकरद्वारे गावात पाणी पुरवले जात नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT