Jalgaon water supply esakal
जळगाव

Water Shortage News : चार तालुक्यांच्या पाणी पातळीत अर्धा मीटरने घट; अतितीव्र उन्हाळ्याचा परिणाम

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : अतितापमानाने जिल्ह्यातील विहिरींच्या पाणी पातळीत घट होत आहे. मे महिन्यात तापमान ४० ते ४७ अंशादरम्यान होते.

यामुळे जिल्ह्यातील चार तालुक्यांतील पाणी पातळीत अर्धा मीटरने घट झाल्याची माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागाकडून देण्यात आली. आगामी १५ दिवसांत पाऊस न झाल्यास जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. (water level of four taluks decreased by half meter effect of hot summer If rains prolonged there are signs that shortage will increase Jalgaon News)

जिल्ह्यातील बोदवड, यावल, भुसावळ आणि जामनेर तालुक्यांतील भूजल पातळीत ०.३५ मीटरने घट झाली असून, इतर तालुक्यांत पाण्याची पातळी समाधानकारक आहे.

मे महिन्यात तापमानाचा पारा ४५ ते ४७ अंशापर्यंत पोहोचला होता. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा कमी झाला आहे.

भूगर्भातील पाणीसाठा नेमका किती कमी झाला, याची नोंद वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागाकडून घेतली जाते. साधारणत: तीन टप्प्यात ही नोंद घेण्याचे काम होते. मे महिन्यात घेतली जाणारी नोंद जिल्ह्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या नोंदीनुसारच प्रशासकीय स्तरावर पाण्याचे नियोजन केले जाते.

१७८ विहिरींचे निरीक्षण

भूजल पातळीची नोंद घेण्यासाठी जिल्ह्यातील १७८ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. त्यात मुक्ताईनगर तालुक्यातील ११, रावेर १०, भुसावळ ७, बोदवड ६, यावल ७, जामनेर २४, जळगाव १५, धरणगाव ७, एरंडोल ४, चोपडा १४, अमळनेर १४, पारोळा १६, पाचोरा १४, भडगाव ८ आणि चाळीसगाव तालुक्यातील २१, अशा एकूण १७८ विहिरींचे निरीक्षण केल्यानंतर भूजल पातळी निश्‍चित करण्यात आली.

वाढ झालेल्या निरीक्षण विहिरींची संख्या १४४ असून, ३४ निरीक्षण विहिरींमध्ये घट दर्शविली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

विहिरींच्या निरीक्षणानुसार जिल्ह्यातील १५ तालुक्यांची भूजल पातळी निश्‍चित केली आहे. ती अशी

तालुका-- पाणी पातळी वाढ/घट

*भुसावळ--०.८१ (घट)

*बोदवड--०.०१ (घट)

*यावल--०.४३ (घट)

*जामनेर--०.१६ (घट)

*मुक्ताईनगर--०.१३ (वाढ)

*रावेर--०.२८

*जळगाव--०.५८

*धरणगाव--०.९१

*एरंडोल--०.९७

*चोपडा--०.६९

*अमळनेर--०.७३

*पारोळा--०.३५

*पाचोरा--०.८५

*भडगाव--०.६५

*चाळीसगाव--०.४५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

Ghat Road Travel: पावसाळ्यात घाटातील प्रवास सुखकर बनवण्यासाठी कोणती काळजी अन् खबरदारी घ्यावी?

Video : ‘एक उडी’... अन् सगळं संपलं! स्टंटबाजी करताना इमारतीवरून पडला मुलगा, थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ व्हायरल..

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

SCROLL FOR NEXT