Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

महापालिकेच्या 17 मजलीत पाणी टंचाई; कर्मचाऱ्यांची पाण्यासाठी धावपळ

कैलास शिंदे

जळगाव : ‘यह क्या जनता को पाणी पिलाएंगे, ये तो खुदही प्यासे है’ या हिंदी शेरची आठवण व्हावी, असा प्रकार बुधवारी (ता. २५) महापालिकेत (Jalgaon Municipal Corporation) दिसून आला. जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या सतरा मजली इमारतीतच पाणीटंचाई (Water Scarcity) दिसून आली. कर्मचारी अक्षरश: बाटल्या घेऊन थेट इमारतीखाली धावपळ करताना दिसत होते. (water shortag in Jalgaon Municipal corporation buiding Jalgaon News)

सतरा मजली इमारतीत पाण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे. थंड पाण्याचे कुलर असून, त्याद्वारे काही मजल्यांवर पाण्याची सुविधा केली आहे. विशेषत: पाचव्या, आठव्या, दहाव्या, व तेराव्या आणि सतराव्या मजल्यावर पाण्याचे नळ बसविले आहेत. खालच्या बहुतेक मजल्यावरील कर्मचारी पाचव्या मजल्यावर नळाद्वारे पाणी बाटल्यात भरून नेत असतात. प्रत्येक विभागात या नळाद्वारे पाणी बाटल्यात भरून ठेवण्यात येते.

चक्क पिवळसर पाणी
सतरा मजली इमारतीत बुधवारी सकाळी पाणी आले. मात्र, ते पिवळसर असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी पाणी भरलेच नाही. मात्र, दुपारी बारानंतर नळाचे पाणी बंद झाले. प्रत्येक विभागातील कर्मचारी बाटल्या घेऊन लिप्टमधून या मजल्यावरून त्या मजल्यावर धावाधाव करीत होते. मात्र, ज्या मजल्यावर पाण्याची सुविधा होती, त्या मजल्यावरील नळांना पाणीच नव्हते. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी सतरा मजली इमारतीच्या खाली जाऊन पाणी आणले. सायंकाळपर्यंत या नळांना पाणी आलेच नव्हते. सतरा मजली इमारतीतील पाणी का बंद होते. याबाबत मात्र कुणीही माहिती देऊ शकले नाही. अधिकारी व पदाधिकारीही उपस्थित होते, तर काही नगरसेवकही होते. मात्र, सर्वजण आपल्या आपल्या कामात व्यस्त होते. कर्मचाऱ्याच्या या धावपळीची कोणी दखलही घेतली नाही. आपल्याच कार्यालयातील पाणीटंचाईची दखल न घेणारे अधिकारी व पदाधिकारी जनतेची किती दखल घेणार हाच प्रश्‍न आहे. ‘दिव्या खाली अंधार’, असाच प्रकार बुधवारी सतरा मजली इमारतीत दिसून आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT