Girna Dam
Girna Dam esakal
जळगाव

Jalgaon Water Scarcity : टंचाईच्या झळा होताहेत अधिक गडद...! धरणांतील साठा निम्म्यापेक्षा कमी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्यातील तापमान ४७ अंशावर पोचले आहे. अतितापमानामुळे आतापर्यंत पाच जणांचा उष्माघातसदृश तापाने मृत्यू झाला आहे. ‘अल निनो’मुळे तापमानात वाढ होत असून, अतितापमानाचा अनेक बाबींवर दुष्परिणाम होत आहे. (water storage in dam is less than half jalgaon news)

अतितापमानामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन तीव्र गतीने होत असून, पाणीसाठ्यात घट होत आहे. वाघूर धरण वगळता इतर धरणांतील साठा निम्म्यापेक्षा कमी झाला आहे. यामुळे भविष्यात तीव्र पाणीटंचाई जाणवेल.

उष्णतेची लाट जिल्हाभरात जाणवत आहे. वाढत्या उन्हासोबत पाणीटंचाईचेही संकट जिल्हावासीयांवर उभे राहिले आहे. यंदा पावसाळा एक महिना उशिराने होणार असल्याचा अंदाज वर्तविल्याने जिल्हा प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत.

धरणांमध्ये ४४ टक्के साठा

जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या गिरणा धरणातील साठाही गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा टक्क्यांनी घटला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी गिरणा धरणात ३८.५८ टक्के साठा होता. यंदा मात्र त्यात घट झाल्याने तो आता २७.६८ टक्के झाला आहे.

१४ गावांमध्ये १६ टँकरद्वारे पाणीपुरवठा

जामनेर तालुक्यातील मोरगाव, रोटवद, नेरी दिगर येथे चार टँकर, भडगाव तालुक्यातील तळबंद तांडा, वसंतवाडी दोन टँकर, बोदवड तालुक्यातील एनगाव एक टँकर, पारोळा तालुक्यातील हनुमंतखेडा, खेडीढोक येथे दोन टँकर, चाळीसगाव तालुक्यातील मौजे पिंपळगाव येथे दोन टँकर, भुसावळ तालुक्यातील कंडारी, कुऱ्हे प्र.न. दोन टँकर, पाचोरा तालुक्यातील रामेश्‍वर आणि लोहारा येथे तीन टँकर, अशा एकूण १४ गावांत १६ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

धरणातील साठा असा

धरणाचे नाव--टक्के पाणी

हतनूर--५३.८२

वाघूर--६८.१०

मन्याड--१५.३०

भोकरबारी--२.०७

सुकी--६४.५४

अभोरा--६४.७३

अग्नावती--६.६०

तोंडापूर--४४.१७

हिवरा--१२.५७

मंगरूळ--४८.३५

बहुळा--२४.८१

मोर--६७.४९

अंजनी--२५.४९

गूळ--६७.५३

"यंदा ‘अल निनो’च्या प्रभावाने जिल्ह्यात तापमान अधिक आहे. पावसाळा लांबून पाणीटंचाई अधिक काळ सहन करावी लागू शकते. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा. जुलै, आगस्टपर्यंत पाणीटंचाईचा आराखडा तयार केला आहे." -अमन मित्तल, जिल्हाधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

SRH vs PBKS Live Score : हैरदाबादचा डोळा दुसऱ्या क्रमांकावर; पंजाबचा नवा कर्णधार शेवट गोड करण्यासाठी उत्सुक

Anil Kapoor : "सहजीवनाची 51 वर्षं..."; लग्नाच्या वाढदिवसाला अनिल यांची पत्नीसाठी इमोशनल पोस्ट

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

SCROLL FOR NEXT