Strike again water supply problem esakal
जळगाव

Water Supply Problem : पाणीपुरवठा मंत्र्यांचा मतदारसंघात पाणी पेटले

सकाळ वृत्तसेवा

धरणगाव : शहरात गेल्या २०/२२ दिवसांपासून पाणीपुरवठा सुरळीत नाही. तो सुरळीत करावा, यासाठी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांचा नेतृत्वात प्रशासनाला निवेदन देण्यात येणार होते. मात्र पालिकेत मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला. अखेर मुख्याधिकारी यांच्या पाणीपुरवठा लवकरच सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, महिलांनी मुख्याधिकारी यांच्या खुर्चीला हार घातला.

२२ दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा, या मागणीसाठी सेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, युवासेना जिल्हाप्रमुख नीलेश चौधरी, माजी नगराध्यक्ष उषा वाघ, सुशीला चौधरी यांचा नेतृत्वाखाली शिष्टमंडळ मुख्याधिकारी यांना जाब विचारण्यासाठी गेले.

परंतु तब्बल दोन तास मुख्याधिकारी उशिरा आल्याने संतप्त शिवसैनिकांनी रास्ता रोको केले. या वेळी संतप्त शिवसैनिकांनी पाणीपुरवठा मंत्र्यांच्या तालुक्यातील शहरवासीयांना २२ दिवस पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे, ही शोकांतिका आहे. तसेच शहरात फिल्टर प्लँट असूनसुद्धा पाणीपुरवठा दूषित होत असून, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तातडीने शुद्ध पाणी आणि पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली.(Water Supply Problem Strike again issue of water supply by shivsena Jalgaon news)

तत्पूर्वी उड्डाणपुलावर असंख्य शिवसैनिकांनी रास्ता रोको करून प्रशासनाचा निषेध केला. आंदोलनस्थळी महिलांनी हंडा फेकून निषेध केला. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, उषा वाघ, नीलेश चौधरी, राजेंद्र ठाकरे, धीरेंद्र पुरभे, भरत महाजन, लक्ष्मण महाजन, शरद माळी, संतोष सोनवणे, भागवत चौधरी, कृपाराम महाजन, महेश चौधरी, जयेश महाजन, दिलीप महाजन, बाळू महाजन, रामकृष्ण महाजन, बापू महाजन, विलास पवार, सुनील जावरे यांच्यासह शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.

पाणी समस्या कायमची...

गेल्या वर्षी महिलांनी पाण्यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष यांच्या दालनात ठिय्या मांडला होता. बांगड्या फोडल्या होत्या, तर शहरातील पाणीपुरवठ्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले होते. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाषअण्णा पाटील यांनी पालकमंत्र्यांनी धरणगावला दोन- तीन दिवसांआड पाणीपुरवठा केल्यास भाजपतर्फे त्यांचा सत्कार करू, असे आव्हान पत्रकार परिषदेत केले होते. मात्र पाण्याची परिस्थिती आजही ‘जैसे थे’ आहे

पाणीप्रश्न कायम, आंदोलनकर्त्यांत बदल

राज्याच्या राजकारणाचा परिणाम पालिकेवर पर्यायाने शहरातील समस्येवर देखील होत आहे. गेल्या वर्षी महाविकास आघाडीचे सरकार होते. पालिकेत सेनेची सत्ता, पालकमंत्री सेनेचे त्यामुळे पाण्यासाठी आंदोलन करण्यात भाजप पदाधिकारी अग्रेसर होते. आता सेनेत फूट पडून सेना (शिंदे गट)- भाजप राज्यात सत्तेत आहे, तर अनेक वर्षे पालिकेवर सत्ता असणारे शिवसेनेचे (ठाकरे गट) पदाधिकारी पाण्यासाठी आंदोलन करीत आहेत. या सर्व

राजकारणाचा सर्वसामान्य नागरिकांना वीट आलेला आहे

धरणगाव शहरातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटेल, अशी अपेक्षा आता नागरिकांनी सोडून दिली आहे. सगळेच राजकारणी सारखे असे म्हणून नागरिक पाणीप्रश्न सहन करीत आहेत. मात्र राजकारण्यांनी जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, अशी प्रतिक्रिया नोंदविल्या. दुसरी बाजू पाहता अनेक वर्षांपासून ज्यांच्या इशाऱ्यावर पालिका चालत होती, ते सेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ पाणीप्रश्नासाठी पालिका प्रशासन विरोधात उभे ठाकले आहेत, तर पालिकेची मुदत संपल्यामुळे नगराध्यक्षपद गेलेले नीलेश चौधरीदेखील निवेदन देताना उपस्थित होते. मात्र त्यांच्या कार्यकाळातही गेल्या वर्षी पाण्यासाठी आंदोलन, मोर्चे निघाले आहेत. त्यावेळी देखील पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील होते. त्यामुळे नेते ही तेच आणि समस्या जुनीच फक्त मागणी नव्याने असे स्वरूप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : कर्जाच्या पैशातून मोदींचा केक कापणार? वाढदिवस साजरा करणे म्हणजे आर्थिक गुन्हा, संजय राऊतांचे राज्य सरकारवर ताशेरे

Latest Marathi News Updates : कांद्याचे दर घसरले, शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

जरा आवरा अन् Google Gemini ला स्वत:चे पर्सनल फोटो देण्यापूर्वी ही बातमी वाचा... नाहीतर वेळ निघून जाईल, तज्ज्ञांचा इशारा

कलाकार हवा तर असा ! दशावतारचं यश पाहून हिंदी मीडियाने केलं दिलीप प्रभावळकरांचं कौतुक "बॉलीवूडला लाज वाटायला.."

Rahuri Accident: 'दुचाकींच्या अपघातात एक ठार, एक जखमी'; दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर भीषण धडक

SCROLL FOR NEXT