Jalgaon news esakal
जळगाव

ह्रदयद्रावक! अंत्ययात्रेत घुमले मंगलाष्टकांचे स्वर; टाहो फोडत आईने टाकल्या अक्षता

शंकर भामेरे

पहूर (ता. जामनेर) : मुलगी आणि पतीपाठोपाठ जगण्याचा आधार असलेल्या एकुलत्या एक मुलाचाही मृत्यू झाल्याने दुर्देवी मातेवर दुःखाचा डोंगर कोसळल्याची घटना पहूर येथे घडली.

तीन वर्षांपूर्वी मुलगी रोहिणी अठरा वर्षांची असताना अपस्मार आजाराने मृत्युमुखी पडली. दीड वर्षांपूर्वी पती मनोज रमेश सोनवणे यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

मुलगी आणि पत्नी गमावल्याचे दुःख उराशी कवटाळत जगण्याचा आधार असलेल्या एकुलत्या एक मुलाला शिकवून बँकेत अधिकारी बनवावं, असे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मातेला मात्र त्याच्याच अंत्ययात्रेत मंगल अक्षता टाकण्याची दुर्दैवी वेळ आली. ही हृदयस्पर्शी कहाणी आहे पहूर कसबे येथील रहिवासी रंजना मनोज सोनवणे यांची.

शनिवारी (ता. २८) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास त्यांचा मुलगा रघुवीर मनोज सोनवणे (वय १९) याचे अपस्मार आजाराने निधन झाले. गेल्या अडीच महिन्यांपासून तो अंथरुणावर खिळून होता. शेंदुर्णी येथील शेठ राजमल ललवानी उच्च माध्यमिक विद्यालयात वाणिज्य शाखेत त्याने गेल्या वर्षी बारावी परीक्षेचा फॉर्म भरला होता. मात्र परीक्षेदरम्यानच तो उपचार घेत असल्याने त्याचे स्वप्न अधुरेच राहिले.

उपचारासाठी विकले शेत

कोरोनाची लागण झाल्याचे कळतात पतीला वाचविण्यासाठी अल्पभूधारक रंजना सोनवणे यांनी सगळी शेती विकून उपचार केले,परंतु दुर्दैवाने पतीचे प्राण त्या वाचवू शकल्या नाहीत. मुलगी आणि पती वियोगाचे दुःख उराशी कवटाळून मुलगा रघुवीर यास बँकेत अधिकारी बनविण्याचे त्यांचे स्वप्न होते.परंतु नियतीला ते मान्य नसेल म्हणून की काय आज सकाळी सव्वाच्या सुमारास रघुवीरने प्राण सोडले.

मोलमजुरीतून मुलावर उपचार

रंजना सोनवणे यांनी मुलगा रघुवीर याला बरे करण्यासाठी मोलमजुरी करून जळगाव, औरंगाबाद, मुंबई येथील दवाखान्यांमध्ये उपचार केले.

अंत्यविधीत मंगलाष्टके

मृत्यूपश्चात रघुवीरचे सुपारीशी लग्न लावण्यात आले. या वेळी टाहो फोडत दुर्दैवी आई रंजना सोनवणे यांनी भरल्या डोळ्यांनी अक्षता टाकल्या. अंत्ययात्रेसमयी मंगलाष्टकाचे स्वर कानी येताच उपस्थितांची मने हेलावून गेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेवर भाजपला धक्का, शिंदेंच्या शिवसेनेचा विजय!

Nagar Palika Election Result : सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांनी केला करेक्ट कार्यक्रम, एक हाती सत्ता आणत भाजपला दिला झटका

'मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर...' अपघातानंतर नोरा फतेहीची पहिली प्रतिक्रिया, आता कशी आहे तब्येत?

Kankavli Nagar Panchayat Election Result : कणकवलीत नितेश राणेंना जबरदस्त धक्का! नगराध्यक्षपद गेलं; शहरविकास आघाडीचा विजय

Navi Mumbai Crime: धावत्या लोकलमधून तरुणीला ढकलले, माथेफिरू व्यक्तीचे कृत्य; पनवेल स्थानकातील प्रकार

SCROLL FOR NEXT