Bribe crime esakal
जळगाव

Jalgaon Bribe News : लाच स्वीकारताना महिला तलाठी जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : तालुक्यातील खडका हद्दीमधील नवीन खरेदी केलेल्या प्लॉटच्या सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी तीनशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या तलाठी मनीषा गायकवाड यांना जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले.

खडका व साकरी सजामधील तलाठी मनीषा नीलेश गायकवाड (वय ३८, रा. मोरेश्वरनगर, भुसावळ) यांनी तक्रारदाराकडून खडका हद्दीमधील नवीन खरेदी केलेल्या प्लॉटच्या सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी तीनशे रुपयांची लाच मागितली. (While accepting bribe Women Talathi Arrested Jalgaon Bribe News)

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

तसेच मंगळवारी (ता. ३१) तीनशे रुपयांची लाचेची रक्कम स्वतः स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, एन. एस. जाधव, पोलिस कर्मचारी शैला धनगर, ईश्वर धनगर, राकेश दुसाने यांनी सापळा रचून पकडले.

तलाठी मनीषा गायकवाड यांच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक फौजदार सुरेश पाटील, पोलिस कर्मचारी सुनील पाटील, रवींद्र घुगे, जनार्दन चौधरी, किशोर महाजन, सुनील वानखेडे, बाळू मराठे, सचिन चाटे, प्रणेस ठाकूर, अमोल सूर्यवंशी आदींनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत विसर्जन मिरवणुकीत भरधाव कार घुसली, गणपतीच्या ट्रॉलीला धडक देत 4 जणांना उडवलं; घटनास्थळाचा VIDEO

सौंदर्य अन् बुद्धिमत्तेचा संगम! वयाच्या २३व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करून बनली IFS अधिकारी, कोण आहे तमाली साहा?

Asian Games 2026 : अडखळला, पडला... पण जिद्दीने शर्यत पूर्ण करून भारताचा ४४ वर्षांचा दुष्काळ संपवला! कोण आहे सावन बरवाल?

Satara DJ Dolby Action : पोलिसांची कारवाई चुकीचीच! साताऱ्यात डीजे जप्त झाल्यानंतर उदयनराजेंनी थेट घेतली डॉल्बी चालकांची बाजू; पालकमंत्री देसाईंची भूमिका काय?

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात गणपती विसर्जन मिरवणुकीत सतेज पाटलांनी डीजेच्या तालावर धरला ठेका; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT