women beating man esakal
जळगाव

Jalgaon | क्षुल्लक कारणावरून पत्नीकडून पतीला बेदम मारहाण

पत्नीने पतीच्या डोक्यात लोखंडी मुसळ घालून जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

जिवन चव्हाण : सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव (जि. जळगाव) : क्षुल्लक कारणावरून पत्नीने पतीच्या डोक्यात लोखंडी मुसळ घालून जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील हुडको कॉलनीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest marathi news)

याबाबत सविस्तर वृत्त असे,

शहरातील हुडको कॉलनीत बंडू ज्ञानेश्वर वाघ (वय-४०) हे परिवारासह वास्तव्यास आहे. एका खासगी कंपनीत काम करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. दरम्यान वाघ यांच्या पत्नी अनिता वाघ गेल्या पाच दिवसांपासून शेजारील दवाखान्यात सिस्टर म्हणून कामाला जाते. दि. ७ जुलै रोजी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास पत्नी कामावरून घरी आली. तेव्हा त्यांनी पतीकडून १०० रुपयांची मागणी केली. मात्र पतीजवळ ५० रुपये असल्याने ते घेऊन निघून गेली. परंतु थोड्यावेळाने त्या पुन्हा घरी आल्या. व पतीला शिवीगाळ करायला सुरुवात केली.

पती बंडूने शिवीगाळ का करत असल्याचे विचारणा केली असता. त्याचाच राग येऊन घरात पडलेल्या लोखंडी मुसळीने पती बंडू यांच्या खांद्यावर, डोक्यावर जबर मारहाण केली. यामुळे बंडू यांच्या डोक्यातून रक्तस्राव होऊ लागला. त्यावर त्याला तातडीने एका खासगी दवाखान्यात उपचारकामी दाखल करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर बंडू वाघ यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्थानक गाठून पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : पुण्यात रिमझिम पावसानेच झाड कोसळलं

SCROLL FOR NEXT