winter esakal
जळगाव

Jalgaon Winter Update : जिल्ह्यात गुलाबी थंडीची चाहूल; सकाळचे तापमान 18 अंशांपर्यंत

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Winter Update : जळगाव शहरासह जिल्ह्यात दोन ते तीन दिवसांपासून सकाळी आणि रात्री वातावरणात गारवा जाणवू लागला आहे. पहाटे सर्वत्र गारवा पसरून धुके पडत आहे. गुलाबी थंडीची चाहुल लागल्याने आल्हाददायक वातावरणाचा नागरिक मनसोक्त आनंद घेत आहेत.

विशेष करून सकाळी धावणाऱ्यांची संख्या वाढली आहे.( winter start in district jalgaon news)

पावसाळा संपला असला, तरी ऑक्टोबर हीटमुळे हैराण झालेले नागरिक गुलाबी थंडीमुळे सुखावले आहेत. तापमानाचा पारा घसरल्याने सकाळ-संध्याकाळी वातावरणात गारवा जाणवू लागला आहे. हिवाळ्यात पहाटे फिरायला जाणे, व्यायाम करणे शरीरासाठी आरोग्यदायी असते.

त्यामुळे अनेक नागरिक, युवक, महिला सकाळी रस्त्याने ‘मार्निंग वॉक' करताना दिसतात. काहींनी व्यायाम शाळेत जावून व्यायाम करणे सुरू केले आहे. जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग सहा जातो. सकाळी पडणाऱ्या धुक्यामुळे महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू असल्याचे चित्र आहे.

भाजीपाल्यासाठी पूरक वातावरण

थंडीचे हवामान भाजीपाला, कडधान्य शेतीला पूरक असून मुबलक उत्पादनाची शक्यता आहे. हळूहळू थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी ठेवणीतील लोकरीचे कपडे, जाकेट, स्वेटर, शॉल, मफलर-टोपी बाहेर काढले आहेत.

''सकाळी बोचरी थंडी पडत आहे. यामुळे शहरातील वातावरण आल्हाददायक झाले आहे. पहाटे आवर्जून फिरण्यासाठी बाहेर पडत आहे.''- अरूण धांडे (ज्येष्ठ नागरिक, जळगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : जैकांदिवली – चारकोपमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने लोक संतप्त

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT