Wireman who accepted bribe of lakhs arrested by ACB jalgaon bribe news  esakal
जळगाव

Jalgaon Bribe News : लाखांची लाच स्वीकारणाऱ्या वायरमनला ‘एसीबी’चा झटका

एक लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या कंत्राटी वायरमन प्रशांत विकास जगताप (वय ३३, रा. जळगाव) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Bribe News : नव्यानेच बांधकाम झालेल्या घराकरीता मागील वापराचे ४ लाख ६० हजार रुपये दंड माफकरुन देण्यासाठी तब्बल एक लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या कंत्राटी वायरमन प्रशांत विकास जगताप (वय ३३, रा. जळगाव) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली.

मंगळवार(ता.९) रोजी रात्री १० वाजता टॉवर चौकात संशयिताने रक्कम स्वीकारताच लाचलुचपत विभागाच्या पथकाने झडप घालून त्यास अटक केली. रात्री उशिरा या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Wireman who accepted bribe of lakhs arrested by ACB jalgaon bribe news)

खेडी बुद्रूक (ता.जळगाव) परिसरात शेतकऱ्याने नवीन घर बांधले आहे. या घरात वीज मीटर घेण्यासाठी त्यांनी महावितरणकडे अर्ज केला होता. मात्र, त्यांच्याकडे मीटर न बसविता वायरमनने थेट वायर जोडून वीज सुरु करून दिली होती.

अशातच त्यांनी नवीन वीज मिटरसाठी वायरमनकडे तगादा लावला असता त्याने वीज मिटर सद्या शिल्लक नाही असे सांगून टाळाटाळ केली. अचानक त्यांच्या घराला महावितरण कंपनीच्या पथकाने भेट दिली. त्यांना ४ लाख ६० हजार रुपयांची दंड आकारण्यात आला.

दंडाची रक्कम भरल्या शिवाय नवीन वीज मीटर मिळणार नाही, असा निरोप कंत्राटी वायरमन प्रशांत जगताप याने दिला होता. त्यानुसार तक्रारदारांनी कंत्राटी वायरमनची भेट घेऊन त्यांच्याशी बोलणी केली. तडजोडी अंती प्रशांत जगताप याने एक लाख ४० हजार रुपयांत प्रकरण मिटवून देत नवीन मिटर बसवून देण्याचा सल्ला दिला.

त्यानंतर तक्रारदारांनी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची खात्री करीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुहास देशमुख, निरीक्षक अमोल वालझाडे, सहाय्यक फौजदार दिनेशसिंह पाटील, सुरेश पाटील, पोलिस नाईक सुनील वानखेडे, बाळू मराठे.

राकेश दुसाने अशांच्या पथकाने सापळा रचून मंगळवार (ता.९) रोजी रात्री १० वाजता टॉवर चौकातील बॉम्बे कलेक्शन दुकान समोर एक लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना जगताप यांना रंगेहात पकडले.

दरम्यान, वायरमन जगताप याला बुधवारी (ता.१०) जिल्‍हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले न्या. जे. जे. मोहिते यांच्या न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी सरकार पक्षातर्फे कामकाज पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ओमानमध्ये जहाजावर भारतीयाचा मृत्यू, प्लास्टिकमध्ये गुंडाळून थंड पाण्याच्या बाटल्यांनी झाकलं; मृतदेह सडू लागला, मदत मिळेना

Uddhav Thackeray: मातोश्रीवर बैठकीला ९ पैकी चौघेच आले, सर्वजण ठाकरेंसोबतच राऊतांचा दावा; तरीही ऑपरेशन टायगरची भीती

Latest Marathi News Live Update : नाशिक जिल्हयातील नागा-साक्या धरणाने गाठला तळ

Pune Market Yard: पुणे मार्केट यार्डमध्ये केशर आंब्याला १६७ रुपये प्रतिकिलो भाव; पाच वर्षांतील सर्वोच्च विक्रम

Thane News: थीम केक ठरला जीवघेणा! तीन वर्षांच्या चिमुकलीच्या पोटात धातूच्या पिना; ठाण्यातील खळबळजनक घटना

SCROLL FOR NEXT