auto rikshaw accident  esakal
जळगाव

Jalgaon Accident News : सुसाट कारच्या धडकेने प्रवासी रिक्षातील महिला ठार; चौघे जखमी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Accident News : रंग घेवून मोताळा येथे निघालेल्या प्रवासी रिक्षाला भरधााव कारने पाठीमागून धडक दिली. नशिराबादला मुंजोबा मंदिराजळ उड्डाणपुलावर झालेल्या या अपघातात एक महिला ठार झाली, तर अन्य चार प्रवासी जखमी झाले आहे.(woman dead due to accident by car jalgaon accident news )

आस्माबी शेख मंजूर (वय ३०, रा. बोरखेडी, ता. मोताळा, जि. बुलढाणा) असे मृत महिलेचे नाव आहे. बुधवारी (ता. ११) सायंकाळच्या सुमारास जळगावहून प्रवासी व रंग घेऊन निघालेली रिक्षा (एमएच १९, बीयू ५८४३) भुसावळकडे जात होती.

याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने (एमएच १९, इए ५१०९) उड्डाणपुलावर रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली.ही धडक इतकी जोरात होती की, रिक्षा उलटून त्यातील प्रवासी महिला आस्माबी यांचा जागीच मृत्यू झाला.

तर त्यांच्यासोबत असलेले अन्य चार प्रवासी गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्‍वर मोताळे, सहाय्यक फौजदार हरिष पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

जखमींमध्ये जुबेर शेख मेहबुब शेख (वय ४०), करीम बेग शरीफ बेग (वय २९), शेख सादीक शेख इसार (वय ४०) व शेख उमेमा शेख जुबेर (वय ६) यांचा समावेश असून, त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT