Lakshmi Yojana : 'लक्ष्मी' योजनेतून आता प्रत्येकाच्या ‘सातबारा’वर घरातील महिलेचे नाव लावून तिला तिच्या हक्काची जाणीव करून दिली जाईल, अशी माहिती नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी महसूल सप्ताहानिमित्त लाभार्थ्यांना जागेवर लाभ वितरण कार्यक्रमात बोलताना दिली. ग. स. हायस्कूलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. (woman name on satbara Implementation of Lakshmi Yojana jalgaon news)
या वेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, परीविक्षाधिन जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, चोपड्याचे उपविभागीय अधिकारी एकनाथ भंगाळे, अमळनेर तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, चोपडा तहसीलदार थोरात उपस्थित होते.
शेतकरी अथवा नागरिकांना विविध सात प्रकारच्या नोंदी करण्यासाठी आता तहसील अथवा तलाठी कार्यालयात चकरा मारायची गरज नसून ई हक्क प्रणालीतून ते घरबसल्या किंवा सेतू, संग्राम, आपले सरकार केंद्रावरून अर्ज करू शकतात, अशीही माहिती आयुक्त गमे यांनी दिली.
‘पेन्शन आपल्या दारी’ योजना राबविणारा जळगाव जिल्हा राज्यातील पहिला जिल्हा असल्याचे देखील त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी प्रास्ताविकातून अमळनेर विभागाचा आढावा मांडला.
या वेळी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला ‘उभारी’ योजनेंतर्गत माधुरी मैराळे या महिलेस धनादेश व विविध लाभ वाटप करण्यात आले. महिलेच्या मुलांना दहावीपर्यंत मोफत शिक्षण देणाऱ्या संचालक भटू पाटील यांचाही सत्कार करण्यात आला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या वेळी प्रा. सुभाष पाटील यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. महेंद्र बोरसे यांनी सात्री रस्त्याच्या अडचणी मांडल्या, तर जितेंद्र ठाकूर यांनी रेशन समस्यांची तक्रार केली.
कार्यक्रमास नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, संतोष बावणे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, मंडळाधिकारी विठ्ठल पाटील, जगदीश पाटील, शिरीष सैंदाणे, गौरव शिरसाठ, नितीन ढोकणे, पुरुषोत्तम पाटील, संगीता घोंगडे, मुकेश काटे, संदीप पाटील, स्वप्नील कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले. संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी आभार मानले.
उल्लेखनीय कार्याचा गौरव
स्मशानभूमी नसलेल्या खेडी गावाला शेती बक्षीसपत्र करून देणाऱ्या नरेंद्र मोतीलाल पाटील यांचाही सन्मान करण्यात आला.
तसेच ई-शिधा पत्रिका, सलोखा योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना, भूविकास बँकेचा बोजा कमी करणे, मतदान कार्ड आदी लाभ देण्यात आले. माझी माती माझा देश अभियानांतर्गत माजी सैनिक, वीर पत्नी, वीर माता यांचाही सन्मान करण्यात आला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.