Honey Trap
Honey Trap  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : ‘महिला गँग’ ने डॉक्टरला Honey Trapमध्ये गुंतवले

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये कार्यरत ४० वर्षीय डॉक्टरकडे उपचाराच्या नावाने आलेल्या महिला गँगने डॉक्टरलाच हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. डॉक्टरची व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत सात लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी डॉक्टरांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली. (Women Gang implicates Doctor in Honey Trap asked for ransom of 7 lakh Jalgaon Crime News)

जळगाव शहरात न्यायालयाशेजारी दवाखाना असलेल्या डॉक्टरांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे शनिवारी (ता. १५) उपचारासाठी आलेल्या दोन महिलांनी (एक महिला जळगाव शहरातील व दुसरी यावल तालुक्यातील आहे.) औषधोपचाराच्या नावाने ओळख निर्माण करून कटकारस्थान रचले. संबंधित डॉक्टरांकडे उपचाराला आलेल्या महिलेसोबत असलेल्या तरुणीसोबत असताना डॉक्टरांचे मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले.

चित्रीकरण झाल्याची खात्री झाल्यावर चेतन व हिरामण नावाच्या संशयितांनी डॉक्टरांच्या खोलीत शिरून त्यांना मारहाण करत तुमचे कारनामे व्हायरल करतो, असे धमकावून सात लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. शेवटी या त्रासाला कंटाळून डॉक्टरने शहर पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली. जळगाव शहरातील पिंप्राळा हुडकोतील एक व यावल तालुक्यातील दुसरी तसेच जळगावच्या इतर दोन अशा चौघींसह चेतन राजेंद्र कासार, हिरामण एकनाथ जोशी, प्रदीप सुरेश कोळी, (सैदाणे), संदीप बबन लोंढे (सर्व रा.जळगाव) यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर तपास करीत आहेत.

खंडणी बहाद्दरांचा सुळसुळाट

जळगाव शहरात माहिती अधिकार कार्यकर्ता, तोतया लाचलुचपत अधिकारी, बनावट पत्रकार, न्यूज पोर्टल चालक, अन्न व औषध प्रशासनाचे कथित व्हिडिओग्राफर-पत्रकार यांच्याकडून शहरातील दूध डेअरी, मिठाई विक्रेते, पान दुकान चालक, डॉक्टर, खाद्यपदार्थांचे हॉटेल चालक यांच्याकडून खंडण्या उकळल्या जात असल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. पैसे द्या नाही तर... तुमचा व्हिडिओ व्हायरल करतो, तुम्ही काय विकता, काय तयार करता याचे चित्रीकरण झाले आहे, असे सांगत हजार-पाचशे रुपयांपासून दहा लाखांपर्यंत खंडणी मागितली जाते.

या संदर्भात नुकतेच जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. यात जिल्हा परिषदेत कार्यरत कंत्राटी महिला कर्मचाऱ्याकडे बोगस पत्रकार, तोतया लाचलुचपत अधिकारी बनून मागणी, मोहाडी रुग्णालयातील डॉक्टरकडे बोगस माहिती अधिकार कार्यकर्ता बनून मागणी, प्रसिद्ध डेअरी चालकाकडे पोर्टल पत्रकार, फूड ॲन्ड ड्रग्ज अधिकारी म्हणून जात मागणीचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : मुंबई, ठाणेसह कोकणात आज उष्णतेच्या लाटेचा 'हवामान'चा इशारा

SCROLL FOR NEXT