जळगाव

Jalgaon Accident News : दुचाकीसमोर आलेल्या मोकाट कुत्र्याने घेतला गृहिणीचा बळी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Accident News : म्हसावद (ता. जळगाव) फाट्याजवळ अचानक कुत्रा आडवा आल्याने दुचाकी घसरून पडली अन्‌ या अपघातात दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली.

चित्राबाई शालीग्राम पाटील (वय ३०, रा. ताडेपुरा, अमळनेर) असे या महिलेचे नाव असून, दुर्दैव असे की, दोनच महिन्यांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाले आहे. त्यामुळे अवघ्या दोन महिन्यांच्या अंतराने मातृ-पितृ छत्र हरपून त्यांची दोन्ही अपत्य अनाथ झाली आहेत. (women killed in accident due to dog jalgaon news)

याबाबत जिल्हा रुग्णालयात संबंधितांच्या परिचितांनी माहिती दिली. त्यानुसार चित्राबाई ह्या परिवारासह ताडेपुरा, अमळनेर येथे वास्तव्यास होत्या. त्यांच्या पतीचे दोन महिन्यांपूर्वीच निधन झाले आहे. गेल्या शनिवारी (ता. ३०) सायंकाळी सातच्या सुमारास त्या मामेभाऊ व मुलासोबत दुचाकीने म्हसावद फाट्याजवळून जात होत्या.

त्यावेळी दुचाकीसमोर अचानक कुत्रा आडवा आला. त्यामुळे अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकी घसरून चित्राबाई खाली पडल्या.

दुचाकीसह घसरत जावून आपटल्याने त्यांच्या डोक्याला जबर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, या हृदयद्रावक घटनेची अद्याप पोलीस ठाण्यात नोंद झालेली नाही.

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त नाहीच

जळगाव महापालिका असो की जिल्ह्यातील ग्रामपंचायती किंवा जिल्‍हापरिषदेचा आरोग्य विभागही मोकाट जनावरांवर कारवाई करण्यास पुर्णतः अकार्यक्षम आहेत. महामार्गालगतीची गावे तर या मोकाट जनावरांमुळे मृत्युचे सापळे बनले आहेत. मोकाट कुत्र्यांसह इतर पशु महामार्गावर, राज्य मार्गावर येणार नाहीत, यासाठी विशेष प्रयत्न होण्याची अपेक्षा आता व्यक्त होवु लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025 India vs UAE : भारत विरुद्ध यूएई सामना लाईव्ह कुठे पाहाल? जाणून घ्या वेळ अन् सर्व काही...

हैद्राबाद गॅझेटिअरनुसार 8 जिल्ह्यांत कुणबी नोंदींची पडताळणी; 'इतकी' कुणबी प्रमाणपत्रे ठरली वैध, हजारो अर्जांची तपासणी सुरूच

Latest Marathi News Updates : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आजचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द

Solapur Tourist Places: सोलापूरमध्ये फिरायला जायचंय? मग पावसाळ्यात हे ठिकाणे नक्की एक्सप्लोर करा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा चीझ मशरूम सँडवीच, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT