जळगाव

ग्रामपंचायतने लढवली शक्कल; महिला बचत गटाला कर वसुलीची दिली जबाबदारी, परिणाम दिसला  

प्रा.हिरालाल पाटील

कळमसरे :  ता.अमळनेर तालुक्यातील पिंपळी प्र.ज. ग्रामपंचायतींची घरपट्टी पाणीपट्टी ची थकबाकी ही अत्यंत मोठ्या प्रमाणावर आहे. यातच कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर ग्रामपंचायतींनी मास्क ,सॅनिटायझर आणि फवारणी साठी मोठ्या प्रमाणावर खर्च केल्याने ग्रामपंचायतींची परिस्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे.

ग्रामपंचायत कर्मचारी यांचे नियमित वेतन व भत्ते देण्यात येत नाहीत.पंचायतराज संस्था कडे शासनाने वर्ग केलेली 29प्रकारची कामे करण्यासाठी ग्रामपंचायती सक्षम नसल्याने  अमळनेर तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या  ग्रामपंचायत सक्षमीकरण अभियाना अंतर्गत आर्थिक वर्षाच्या शेवटी 100%घरपट्टी व पाणीपट्टी वसुली करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

या पाश्र्वभूमीवर अमळनेर तालुक्यातील पिंपळी प्र.ज. येथील बचत गटांच्या महिलांनी आठ दिवसांत दीड लाख रुपये करवसुली करून एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.त्याबद्दल अमळनेर पंचायत समिती मार्फत त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी पिंपळी प्र.ज. येथील १००% घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी भरणा-या नागरिकांचाही पंचायत समिती मार्फत सन्मान करण्यात आला.

उपायोजना नसल्याने थकबाकी
 डिसेंबर महिना येऊनही घरपट्टी व पाणीपट्टी वसुली चे प्रमाण अत्यंत कमी आहे तरी करांच्या थकबाकी वसुली साठी काही तरी ठोस उपाययोजना नसल्याने अमळनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींची घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे.

आठ दिवसात दिड लाखाच्यावर वसुली 

तालुक्यातील पिंपळी गावातील बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी दीड लाख करवसुली केल्याने गटविकास अधिकारी संदीप वायाळ  यांनी सत्कार करून कौतुक केले आहे.

करवसुलीसाठी अशा उपाययोजना 

-  ग्रामसेवक, सरपंच यांनी करवसुली साठी महिला बचत गटांची करार तत्वावर नेमणूक करावी.

- सर्व ग्रामसेवक, सरपंच व प्रशासक यांनी मासिक सभेत सदर निर्णय घ्यावा.

- कर वसुली काम देण्यापूर्वी बचत गटाच्या सर्व सदस्यांची करभरणा झालेला असावा.

- बचत गटांना देण्यात येणारा मोबदल्याचा दर हा नियमित असावा.

 - .ग्रामसेवक व सरपंच यांनी करभरणा बॅंकेत करून च बचत गटांना निधी चेक किंवा ऑनलाईन पद्धतीने अदा करावा

 

संपादन- भूषण श्रीखंडे  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT