जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाइन कार्यशाळा sakal
जळगाव

जळगाव : आदर्श घरकुलांच्या निर्मितीसाठी काम करा; पालकमंत्री पाटील

जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाइन कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महाआवास अभियान हे राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असल्यामुळे सर्व स्तरांवरील यंत्रणांनी सक्रिय सहभाग द्यावा, आदर्श घरांच्या निर्मितीसाठी उत्कृष्टपणे काम करण्यात यावे, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित ऑनलाइन कार्यशाळेत अधिकारी व लोकप्रतिनिधींशी ते बोलत होते. जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिलेल्या ७१ टक्के घरकुलांचे कामे पूर्ण झाली. उर्वरित कामांना गती देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

पालकमंत्री पाटील म्हणाले, की ग्रामीण भागातील भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत सर्वतोपरी प्रयत्न करावे. प्रत्येक जिल्हा परिषद गटात एक तरी बहुमजली गृहसंकुल (अपार्टमेंट) तयार करावे, प्रत्येक जिल्हा परिषद गटात वाळूला पर्याय म्हणून सँड बँक निर्मिती करावी, पंचायत समिती गणनिहाय लाभार्थ्यांचे वेळोवेळी मेळावे घेऊन त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, जिल्ह्यातील प्रत्येक घरकुलधारकाला जनजीवन मिशनअंतर्गत नळजोडणी करून द्यावी, जिल्हास्तरावर डेमो हाऊस तयार करावे, वाळूसहित इतर बांधकाम साहित्यांची उपलब्धता बहुमजली इमारत गृहनिर्माण वसाहती डेमो हाऊस, परिस्थितीनुसार घरांची रचना नैसर्गिक आपत्तीरोधक असे नवं तंत्रज्ञान इत्यादी नावीन्यपूर्ण बाबींचा या अभियान कालावधीत प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, स्नेहा कुडचे, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक मीनल कुटे, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे आदींनी सहभाग नोंदविला.

५१ हजार ४७४ घरांचे काम पूर्ण

प्रधानमंत्री आवास योजना व राज्यपुरस्कृत आवास योजनेंतर्गत २०२०-२१ व सन २०२१-२२ या दोन वर्षांत एकही घरकुल बांधकामासाठी प्रलंबित नाही. २०१६-१७ ते २०१९-२० या चार वर्षांत चार हजार २० घरकुले जागेअभावी व इतर तांत्रिक बाबींमुळे बांधकामासाठी प्रलंबित आहेत. ९७ हजार ७६४ घरकुलांच्या उद्दिष्टांपैकी ७३ हजार ४५ घरकुलांना जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली असून, ५१ हजार ४७४ (७१टक्के) घरकुल बांधकाम पूर्ण झालेले आहेत. उद्दिष्टांपैकी २४ हजार ७१९ घरकुलांना मंजुरीबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Microsoft Layoff: टेक क्षेत्रात पुन्हा मोठा धक्का! मायक्रोसॉफ्टने ४,८०० कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; एचआर प्रमुखांनी थेट कारणच सांगितलं

Raigad District Rain : रायगड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Rajgad Rain : राजगड तालुक्यातील पासली खोऱ्यातील बालवड पूल पाण्याखाली; परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटला

Mumbai Pune Railway Close : मुंबई-पुणे रेल्वे १५ तासांहून अधिक काळ ठप्प; सेवा केव्हा सुरू होणार?

ZIM vs BAN, ODI: झिम्बाब्वेने केला बांगलादेशचा गेम! चुरशीच्या लढतीत धूळ चारत मालिकेत घेतली आघाडी

SCROLL FOR NEXT