जळगाव : तालुक्यातील नंदगाव येथे तरुणाईने एकत्र येत वृक्षाला मैत्रीचा धागा बांधत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला. या आदर्शवत उपक्रमाद्वारे ‘मैत्रीचा दिवस’ साजरा केला. (world Friendship Day 2022 Thread of friendship tied to tree by youth jalgaon Latest marathi news)
आॕगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी जगभर मित्र दिवस साजरा केला जातो. या वेळी नंदगाव येथील नानाश्री युवा मित्र परिवाराने एकमेकांना मैत्रीचा धागा बांधला. यासोबतच पर्यावरणाशी मैत्री करून झाडांनाही मित्र म्हणून स्वीकारले आणि झाडांनाही मैत्रीचा धागा बांधत पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी घेतली. या उपक्रमात गणेश कोळी, कल्पेश सोनवणे, जितेंद्र बाविस्कर, राकेश धनगर, गुरुदत्त सोनवणे, अरविंद सोनवणे, रोहित मोरे, मयुर कोळी, स्वप्नील सोनवणे आदी सहभागी झाले. निसर्ग संगोपन करण्याची शपथही तरुणाईने घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.