vaccine sakal
जळगाव

जळगाव : लसीकरणाची वर्षपूर्ती, मोदी सरकारचा विकासाचा उंचावता आलेख ; भोळे

१६ जानेवारी २०२१ रोजी मनीष कुमार नावाच्या ३४ वर्षांच्या सफाई कर्मचाऱ्यास कोविड लसीची पहिली मात्रा देऊन या मोहिमेचा आरंभ करण्यात आला होता

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कोविड प्रतिबंधक लसीकरणाची (Vaccination)वर्षपूर्ती हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)सरकारच्या विकासाचा उंचावता आलेख आहे, असे मत आमदार सुरेश भोळे यांनी व्यक्त केले. गेल्या वर्षी, १६ जानेवारी २०२१ रोजी मनीष कुमार नावाच्या ३४ वर्षांच्या सफाई कर्मचाऱ्यास कोविड लसीची(Covid Vaccine) पहिली मात्रा देऊन या मोहिमेचा आरंभ करण्यात आला होता. त्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. केंद्र सरकारच्या या यशाबाबत आमदार सुरेश भोळे यांनी म्हटले, की १४ जानेवारी २०२२ रोजी या मोहिमेअंतर्गत लसीकरणाच्या १५६ कोटी मात्रा पूर्ण झाल्या असून, ९३ टक्के जनतेचे पहिल्या मात्रेचे तर ७० टक्के जनतेचे दोनही मात्रांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

दररोज सरासरी ४३ लाख लोकांचे लसीकरण करणारी जगातील ही सर्वाधिक वेगवान मोहीम मोदी सरकारमुळेच देशात राबविली गेल्याने देशाला कोविडविरोधी सुरक्षेचे मोठे कवच प्राप्त झाले आहे. कालपर्यंत देशातील १५ ते १८ वयोगटातील ४३ टक्के युवकांना पहिली मात्रा पूर्ण झाली आहे, अशी माहितीही आमदार सुरेश भोळे यांनी दिली. मोदी सरकारच्या कोरोनाविरोधी लढाईस लसीकरणामुळे मोठे बळ मिळाले असून देशाचे जनजीवन वेगाने पूर्वपदावर येत आहे. मात्र एका बाजूला सर्वाधिक सुरक्षा उपायाचा अवलंब करतानाही जनजीवन पूर्वपदावर येण्याकरिता केंद्र सरकार अटोकाट प्रयत्न करीत असताना महाराष्ट्र मात्र पुन्हा सर्व व्यवहार बंद करून राज्याला अस्थिरतेकडे नेत आहे, असा आरोपही त्यांनी केला.(Latest Jalgaon News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तीन वेळा डेडलाईन… तरीही योजना कागदावरच का? 'झिरो प्रिस्क्रिप्शन’चा अर्थसंकल्पात स्पष्ट उल्लेख नाही!

Google Search : फेब्रुवारी महिन्यात सगळ्यात जास्त बघण्यात आले 'हे' 5 व्हिडिओ, गुगल सर्च ट्रेंड डेटामुळे जगभर खळबळ

Mhada: रहिवाशांना गुडन्यूज! घरं रिकामी करण्यासाठी शिप्टींन चार्जेस देणार, आर्थिक मदतीसाठी म्हाडाचा मोठा निर्णय

EKA Mobility : इलेक्ट्रिक वाहन निर्मिती, स्त्रीसन्मान अन् तरुणांना रोजगार; EKA Mobility चा तिहेरी विजय! वाचा सविस्तर यशोगाथा

Latest Marathi News Live Update : रे रोड येथे हत्येचा प्रयत्न; क्रेन ऑपरेटरवर लोखंडी रॉडने हल्ला

SCROLL FOR NEXT