crime news update esakal
जळगाव

फोनवर बोलणे झाल्यानंतर दिव्याने घेतला गळफास; गुन्हा दाखल

मयत दिव्याच्या मोबाईलमध्ये पोलिसांना कॉल रेकॉर्डिंग, व्हिडिओ-फोटो आढळून आले असून पोलिसांनी मोबाईल ताब्यात घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : चुलत मामाच्या मुलीसोबत प्रेमसंबंध ठेवत लग्नाला नकार देणाऱ्या नीलेश मंगलसिंग गायकवाड (रा. लोहारा, ता. पाचोरा) याच्याविरुद्ध अखेर दिव्या जाधव या तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मयत दिव्याच्या मोबाईलमध्ये दोघांचे कॉल रेकॉर्डिंग, व्हिडिओ-फोटो आढळून आले असून पोलिसांनी मोबाईल ताब्यात घेतला. शेवटचे बोलणे नीलेशसोबत झाल्याचे आढळून आले आहे. (Latest Marathi News)

पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथील दिव्या दिलीप जाधव (वय २१) ही आई-वडिलांसह गावात वास्तव्याला होती. तिच्या चुलत आत्याचा मुलगा नीलेश मंगलसिंग गायकवाड याने लग्नाचे आमिष दाखवून दिव्याचा प्रेमासाठी होकार मिळवला. भूलथापा देत तिच्याशी दोन वर्ष प्रेमसंबंध ठेवले. दिव्याच्या कुटुंबीयांनी नीलेश गायकवाड यांच्या घरी जाऊन लग्नाबाबत मागणी घातली. मात्र, मुलाच्या आईने त्यास स्पष्ट शब्दात नकार देत त्यांना पिटाळून लावले. २३ जून रोजी राहत्या घरात दिव्या जाधव(वय २१) या तरुणीने पंख्याला गळफास घेतला.

दिव्याचा मोबाईल ताब्यात

मयत दिव्या जाधव या तरुणीकडे असलेल्या मोबाईलमध्ये कुटुंबीयांनी पाहणी केल्यावर त्यांना नीलेश व दिव्याचे लग्नासंबंधीचे कॉल रेकॉर्डिंग, दोघांचे फोटो, व्हिडिओ आणि एसएमएस मिळून आले आहेत. याबाबत पंचनामा करुन पुरावे संकलित करण्यात आले आहेत. सोमवारी (ता. १८) दिव्याची आई राधाबाई यांच्या तक्रारीवरुन जळगाव शहर पोलिस ठाण्यात नीलेश याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs GT Live: गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली! KL Rahul चे शतक हुकलं अन् डेव्हिड मिलरचे प्रयत्नही फसले, दिल्ली कॅपिटल्स १ धावेने हरले

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी आहे का? तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय केलं होतं भाकित? खरं काय जाणून घ्या

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

SCROLL FOR NEXT