SYSTEM
जळगाव

Indore Bus Accident | अविनाशचे ‘स्टेट्स’ ठरले अखेरचे; पाडळसरेसह परिसरात शोककळा

इंदूरवरून अमळनेरला येणारी अमळनेर आगाराची बस मध्य प्रदेशातील खरगोन आणि धार जिल्ह्याच्या सीमेनजीक नर्मदा नदीत कोसळली.

सकाळ वृत्तसेवा

कळमसरे (ता. अमळनेर) : इंदूरवरून अमळनेरला येणारी अमळनेर आगाराची बस मध्य प्रदेशातील खरगोन आणि धार जिल्ह्याच्या सीमेनजीक नर्मदा नदीत कोसळली. या अपघातात पाडळसरे (ता. अमळनेर) येथील अविनाश संजय परदेशी प्रवास करीत होता. भावाच्या वाढदिवसासाठी तो इंदूरला गेला होता. गावी परतताना अविनाशने भ्रमणध्वनीवर स्टेट्‌स ठेवले होते. ते अखेरचे ठरले. (Latest Marathi News)

पाडळसरे येथील अविनाश परदेशी (वय २४ ) हा तीन ते चार दिवसांपासून इंदूर येथे स्थायिक असलेल्या मावशीकडे गेला होता. त्याचा लहान भाऊ तिथे कामानिमित्त वास्तावास आहे. लहान भावाच्या वाढदिवसाला अविनाश गेला होता. नेमका अविनाश सोमवारी याच बसने परत गावी येण्यासाठी निघाला आणि आपल्या मोबाईलवर त्याने मराठीत ‘वे टू पाडळसरे’, असे स्टेट्स ठेवत प्रवासाला सुरवात केली. मात्र, नियतीला वेगळेच मान्य असेल आणि या अपघातात त्याच्यावर काळाने झडप घातली आणि त्याच्या मोबाईलवरील स्टेट्स अखेरचे ठरले.

त्याच्या अकाली एक्झिटने संपूर्ण पंचक्रोशीतील जनसमुदाय शोकमग्न झाला आहे. अविनाशची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, कळमसरे येथे तो कपड्यांना इस्त्री करून उदरनिर्वाह करीत होता. घरात तो कर्ता असल्याने त्याच्या घरच्यांचा आक्रोश मन हेलावणारा होता. त्याच्या मागे वृद्ध आजी, अर्धांगवायू झालेले आजोबा, आई व लहान भाऊ असा परिवार आहे. घरातील कर्ता गेल्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT