death  esakal
जळगाव

जांभळाचा मोह जिवावर बेतला; झाडावरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

जांभुळ तोडत असताना झाडाची फांदी तुटल्याने हा तरुण थेट जमिनीवर कोसळला होता.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जांभूळ तोडताना फांदी तुटल्याने जमिनीवर पडल्याने गंभीर जखमी झालेल्या एकाचा रविवारी (ता. ८) पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


शहरातील हरिविठ्ठलनगरातील गांधीनगर येथील ज्ञानेश्वर सुकदेव सकट (वय २२) हा तरुण आपल्या आईवडील व दोन भावांसह वास्तव्याला आहे. ज्ञानेश्वर सकट हा महापालिकेत ठेकेदाराकडे वॉटरग्रेसवर गेल्या दोन वर्षांपासून कामाला होता. शनिवारी (ता. ७) रामानंदनगर येथील गिरणा टाकीजवळील एका जांभळाच्या झाडावर चढला होता. जांभुळ तोडत असताना झाडाची फांदी तुटल्याने ज्ञानेश्वर थेट जमिनीवर कोसळला. डोक्याला गंभीर दुखापत झाली. तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. रविवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत ज्ञानेश्वर सकट याच्या पश्चात आई मंगलाबाई, वडील सुकदेव आणि आकाश व प्रकाश हे दोन भाऊ आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

Sangli ACB Trap : भूमी अभिलेखमधील दोघे लाच घेताना जाळ्यात; ईश्‍वरपुरात रचला सापळा, प्रॉपर्टी कार्डावर क्षेत्र दुरुस्तीसाठी घेतले 50 हजार

SCROLL FOR NEXT