Snake bite death esakal
जळगाव

नोकरी करुन त्याला बांधायचे होते घर...सर्पदंशाने घातला स्वप्नांवर घाला

सुट्टी असल्याने तो गावी आलेला होता.

सकाळ वृत्तसेवा

लोहारा (ता. पाचोरा) : येथील तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. ११) सकाळी सातच्या सुमारास घडली. नीलेश सुधीर पाटील (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. (Latest Marathi News)

नीलेश हा सकाळी शेतात जनावरांना वैरण टाकण्यासाठी गेला होता. मात्र वैराणाखाली असलेल्या विषारी सर्पाने दंश केला. त्या दरम्यान त्याला चक्कर यायला लागले. त्याच अवस्थेत तो घरी चालत आला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथून नीलेशची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथे नेण्यास सांगितले. जळगाव जात असताना रस्त्यातच नीलेशची प्राणजोत मावळली. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी नीलेशला तपासणीअंती मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेहाला लोहारा येथे आणून अंत्यसंस्कार करण्यात आले.

नीलेशने जळगाव येथे डी.फार्मची पदवी घेतली होती. तो गोवा येथे नोकरीसाठी गेला होता. सुट्टी असल्याने तो गावी आलेला होता. नोकरी करून घर बांधेल, असे तो घरच्यांना सांगत होता. असे वडील टाहो फोडत सांगत होते. खूप मोठी स्वप्ने बघितली होती. नीलेशच्या जाण्याने सर्व धुळीस मिळाली. नीलेश हा शांत व मनमिळाऊ स्वभावाचा होता. त्याने सर्वांची मन जिंकून घेतली होती. परंतु नियतीला ते मान्य नव्हते. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून, त्याच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नीलेशच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Attack in Karad : माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या नातवावर बिबट्याचा हल्ला; अधिराज पाटील जखमी, निवडणूक प्रचारातून घरी परतताना बिबट्याची झडप

ZP Elections 2026 Voting Live Update : कराड तालुक्यात ईव्हीएमचा खोळंबा; बुथ ७८ वरील मतदान रखडले, झोनल अधिकाऱ्यांची धावपळ

U19 World Cup: बॅटने इतिहास रचणाऱ्या वैभव सूर्यवंशीने मालिकावीर पुरस्कारानंतर शब्दांनी मनंही जिंकली, जाणून घ्या काय म्हणाला?

Pune News: राज्यातील शासकीय रुग्‍णालयांतील मोफत उपचार बंद; केसपेपरपासून शस्त्रक्रियेपर्यंत शुल्क, अडीच वर्षांनंतर आरोग्य विभागाचा यू-टर्न!

Pakistan Bomb Attack : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या शिया मशिदीत नमाजवेळी आत्मघाती हल्ला; ७० जणांचा मृत्यू, १७० हून अधिक जखमी

SCROLL FOR NEXT