crime esakal
जळगाव

Jalgaon Fraud Crime : चाळीसगावच्या तरुणास 3 लाखांत गंडविले; झटपट श्रीमंतीचा मोह अंगलट

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Fraud Crime : दुपटीने रोखीने नफा मिळवून देण्याचे अमिष देत चाळीसगाव येथील २५वर्षीय तरुणाला सायबर भामट्यांनी चक्क २ लाख ९६ हजारांचा गंडा घातला आहे.

‘डिजिटल करन्सी’त गुंतवणूक केल्यावर नफ्यासह अतिरिक्त बोनस मिळणार या अपेक्षेने केलेल्या गुंतवणुकीतून आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर संकेत जयराज बडगे या तरुणाने सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.(young man from Chalisgaon was cheated of 3 lakhs jalgaon crime news)

चाळीसगाव येथे खासगी नोकरी करुन कुटूंबाचा उदनिर्वाह चालवणारा तरुण संकेत जयराज बडगे (२५, मूळ रा. तिरोडा, जि. गोंदिया, ह.मु. चाळीसगाव) यांच्या व्हॉटस्अप क्रमांकावर तीन जणांनी संपर्क साधून वेगवेगळ्या योजनेत गुंतवणुकीसाठी तयार केले. त्यातही डिजिटल करन्सीत गुंतवणूक केल्यावर दुपटीने नफ्यासह बोनसही मिळेल या आमिषापोटी संकेत बडगे याने (ता.३ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर) या कालावधीत वेळोवेळी ऑनलाईन रक्कम गुंतवली.

दीड महिना होऊनही नफा मिळाला नाही. नफा तर दूरच राहिला मुद्दल रक्कमही गेल्याने आपली फसवणूक झाल्याचे बडगे याच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिल्यावरुन मोबाईलवरुन संपर्कात असलेल्या परदेशी व्हॅटस्‌ॲप क्रमांकधारक तिघा सायबर गुन्हेगारांविरुद्ध जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील करीत आहेत.

मोहाला बळी पडू नका

''कुठल्याही व्यवसायात किंवा गुंतवणुकीत झटपट पैसा दुप्पट करण्याचे आमिष कुणी देत असेल तर, वेळीच सावध व्हावे. सायबर गुन्हेगार सुरवातीला तुम्हाला हजार रुपयांचे पाच हजार परत करुन तुमच्या गुंतवणुकीची मर्यादा ओळखतात. अशा सायबर गुन्हेगारांच्या कचाट्यात सापडल्यावर ते, सहजच दिलेल्या पाच हजारांचे पाच लाख लुबाडून मोकळे होतात.

गुंतवणुकच करायची असेल तर, शेअर बाजारात, म्युचुअल फंड यासारख्या विश्वसनीय योजनांत खात्रीशीर सल्लागारांच्या मदतीनेच गुंतवणूक करावी अन्यथा पश्चतापाची वेळ आल्याशिवाय राहत नाही.''-किसन नजन पाटील वरिष्ठ निरीक्षक, गुन्हेशाखा, सायबर पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

IND vs ENG 2nd Test: इंग्लंडच्या खेळाडूने रिषभ पंतला दाखवलं 'आमिष'; आपल्या पठ्ठ्याने काय उत्तर दिले पाहा, Viral Video

SCROLL FOR NEXT