murder esakal
जळगाव

जळगावातून अपहरणानंतर तरुणाचा मध्यप्रेदशात खुन

रईस शेख

जळगाव : रायपूर- कुसुंबा (ता. जळगाव) येथील परप्रांतीय गृहस्थाचे घरून अपहरण करून नेत मध्य प्रदेशात नेऊन त्याची हत्या करण्यात आली. हत्येनंतर त्याचा मृतदेह निर्जनस्थळी पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार घडल्याचे पोलिसांनी अटक केलेल्या तीन संशयितांच्या जबाबातून स्पष्ट झाले आहे. भूषण तळेले, असे अपहृत गृहस्थाचे नाव असून, त्याला दोन महिन्यांपूर्वी घरातून घेऊन जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

भूषण जयराम तळेले (वय ३०) बऱ्हाणपूर येथील भातखेडा, पानगर येथील रहिवासी. एमआयडीसीतील चटई कंपनीत ते कामासाठी होते. पत्नी व कुटुंबासह जळगाव तालुक्यातील रायपूर (कंडारी) येथे स्थलांतरित झाले. १७ एप्रिलला भूषण तळेले नेहमीप्रमाणे कामासाठी घरातून बाहेर पडले. मात्र, आतापर्यंत घरी परतलेच नाहीत. दोन महिन्यांपर्यंत त्यांची प्रतीक्षा केली. शोध घेत, नातेवाइकांकडे चौकशी केल्यावरही त्यांचा थांगपत्ता लागत नसल्याने भूषण तळेले यांची पत्नी आशा तळेले यांनी २० एप्रिलला एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

अपहरणकर्त्यांवर गुन्हा

आशा तळेले यांच्या तक्रारीत काहीतरी कारणावरून किंवा आर्थिक देवाण-घेवाणीतून पती भूषण तळेले यांना रायपूर येथील भिकन श्‍यामसिंग परदेशी व विठ्ठल प्रेमसिंग परदेशी यांनी अपहरण केल्याचे नमूद आहे. त्यावरून विठ्ठल परदेशी व भिकन परदेशी यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक अनिस शेख तपास करीत आहेत.

अपहरणानंतर खून

पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या पथकातील उपनिरीक्षक अनिस शेख, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, इम्रान सय्यद, गोविंदा पाटील यांनी विठ्ठल परदेशी व भिकन परदेशी यांना ताब्यात घेत पोलिस ठाण्यात पाहुणचार केला. नंतर संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली. भूषण तळेलेचे अपहरण करून मध्य प्रदेशात एका ठिकाणी त्यास डांबून ठेवले. नंतर त्याची हत्या करून मृतदेह निर्जनस्थळी पुरून टाकल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर पोलिसही चक्रावले. दोघांना न्यायालयात हजर केल्यावर न्यायाधीश सोनवणे यांनी ११ जूनपर्यंत कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे ॲड. अनिल गायकवाड यांनी कामकाज पाहिले.

५३ दिवसांनी उलगडा

१७ एप्रिलला भूषण तळेले याचे अपहरण झाले. २० एप्रिलला आशा तळेले यांनी पती हरविल्याची तक्रार दिली. अपरहणानंतर अनोळखी क्रमांकावरून आशा तळेले यांना फोन करून पती सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत होते. अखेर पावणेतीन महिने अर्थात तब्बल ५३ दिवस उलटूनही तपास लागत नसल्याने संशय बळावला. भूषण तळेले यास सेाबत नेणाऱ्या दोघांना चौकशीअंती ताब्यात घेतल्यावर या गंभीर घटनेचा उलगडा झाला. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

भिकनच्या धमक्या

चटई कंपनीतील ठेकेदार भिकन राजपूत याने तक्रारदार आशाबाई यांना त्याच्या सासरहून बोलावून घेत, ‘तू इथंच राहा माझ्याजवळ. तुझा नवरा परत येणार आहे. तू निघून गेली, तर मी आत्महत्या करून चिठ्ठीत तुझे नाव लिहून जाईल’, अशी धमकी दिल्याने आशाबाई त्यांच्या दोन अपत्यांना घेऊन जळगावातच वास्तव्यास राहिल्या. अखेर बन्सी पाटीलने आशाबाईस सांगितले, की तुमचा नवरा बेपत्ता झाला त्या दिवशी विठ्ठल परदेशीसोबत त्याला बघितले होते. त्यावरून खुनाचा उलगडा झाल्याचे पोलिसांनी सांगितले. भूषणच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी एमआयडीसी पोलिस मध्य प्रदेशात रवाना झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT