death
death  esakal
जळगाव

Jalgaon Accident News : भरधाव ट्रॅक्टर उलटून युवक ठार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील भडगाव रोड भागात वाळूने भरलेले भरधाव ट्रॅक्टर शहराकडे येत असताना टायर फुटून उलटले. या अपघातात ट्रॅक्टरचालक युवक ठार झाला. ही घटना शनिवार (ता. ६) पहाटे चारच्या सुमारास घडली. (young man killed due to speeding tractor overturned Jalgaon Accident News)

पवन पाटील (वय २०) असे मृत युवकाचे नाव असून, तो चिंचखेडा खुर्द (ता. पाचोरा) येथील रहिवासी होता. ट्रॅक्टरचालक म्हणून काम करत होता.

शनिवारी (ता. ६) पहाटे वाळूने भरलेले ट्रॅक्टर पाचोरा शहराकडे आणताना स्वप्नशिल्प रेसिडेन्सीसमोर ट्रॅक्टरचे टायर फुटले. त्यामुळे त्याचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला व ट्रॅक्टर महामार्गावरील विजेच्या खांबावर आदळून उलटला.

त्यात तो ट्रॅक्टर खाली येऊन जागीच ठार झाला. त्यास त्वरित ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ. अमित साळुंखे यांनी त्यास मृत घोषित करून शवविच्छेदन केले. मृत पवन पाटील हा आई, वडिलांचा एकुलता मुलगा होता.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्याचे वडील हिंमत पाटील हे सारोळा येथे देशमुखांकडे मजुरीचे काम करतात. मयत पवनच्या पश्चात वृद्ध आई ,वडील व एक बहीण असा परिवार आहे.

दरम्यान, अपघातानंतर पवनच्या हितचिंतक व साथीदारांनी लगबगीने रस्त्यावर पडलेली वाळू, ट्रॅक्टर व तुटलेला विजेचा खांब उचलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT