young man molested tortured and beat woman jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon Crime News : महिलेवर अत्याचार; तरुणाविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : तालुक्यातील शासकीय विभागात कार्यरत महिलेचा पारोळा शहरातातील ३६ वर्षीय तरुणाने विनयभंग, अत्याचार करून महिलेस मारहाण केली. (young man molested tortured and beat woman jalgaon news)

या प्रकरणी शनिवारी (ता.८) पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. समाधान लोटन चौधरी असे संशयिताचे नाव आहे.संबंधित महिलेस संशयित चार ते पाच वर्षांपासून धमकावत होता.

महिलेने त्याच्याशी बोलणे बंद केले होते, तरीदेखील त्याने २५ मार्चला महिलेच्या घरात बळजबरीने घुसून अत्याचार केला. तक्रार केली, तर ठार करण्याची धमकी दिली होती.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

त्यानंतर शनिवारी पुन्हा महिला कामकाजावर कार्यरत असताना वरिष्ठांच्या आदेशान्वये मोटारसायकलने पंचनाम्यासाठी जात असताना नॅशनल हायवे क्रमांक सहावर कृषी विभागासमोर संशयित समाधान चौधरी याने रस्ता अडवून तिच्या डोक्यावर मारहाण केली व ‘तू माझा नंबर ब्लॉक लिस्टमध्ये का टाकला, माझ्याशी का बोलत नाही,’ असे सांगत शिवीगाळ केली.

तक्रार दिल्यास फोटो व्हायरल करून तुझा चेहरा विद्रूप करेल, अशी धमकी देऊन निघून गेला. याबाबत महिलेने पारोळा पोलिसांत संबंधित तरुणाविरुद्ध अत्याचाराची तक्रार दिली. उपनिरीक्षक गंभीर शिंदे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagdusheth Ganpati: भक्तांच्या श्रद्धेला मानाचा मुकुट; दगडूशेठ गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा!

PBKS vs RCB: बंगळुरूने मिळवलं IPL 2026 प्लेऑफचं तिकीट; पंजाबचा सलग ६ व्या पराभवामुळे CSK, RR चा झाला फायदा

Dhule-Solapur Highway: रजापूर उड्डाण पुलाखाली सिमेंट मिक्सर अडकला; दोन तास वाहतूक ठप्प

Severe Water Crisis: आडूळ परिसरात भीषण पाणीटंचाई; मोसंबी, डाळिंब, आंबा बागा सुकल्या, शेतकऱ्यांवर फळबागा तोडण्याची वेळ

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

SCROLL FOR NEXT